गोवा डेअरीत १३ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप

0
156

गोवा डेअरीत मागच्या दोन संचालक मंडळांच्या कार्यकाळात साधारण २०१२ ते २०१७ या कालावधीत सुमारे तेरा ते चौदा कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याचा आरोप डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल फडते यांनी केला आहे. हा १३ ते १४ कोटी रुपयांचा घोटाळा मागच्या दोन संचालक मंडळांच्या कार्यकाळात झाला असून त्यावेळेला गोवा डेअरीचे अध्यक्ष म्हणून बाबूराव फडते देसाई, विठोबा देसाई, माधव सहकारी तसेच राजेश फळदेसाई यांच्याकडे ताबा होता, अशी माहिती त्यांनी दिली. विद्यमान संचालक राजेश फळदेसाई तसेच इतरांकडून गोवा डेअरीच्या व्यवस्थापनावर आता आरोप केले जात आहेत, ते केवळ वैफल्यग्रस्ततेतूनच असेही अनिल फडते यांनी सांगितले.