गोवा डेअरीकडून दूध दरवाढ शक्य

0
7

कुर्टी-फोंडा येथील गोवा दूध उत्पादक संघाकडून (गोवा डेअरी) दुधाच्या दरात लवकरच वाढ होण्याची शक्यता संघाचे अध्यक्ष राजेश फळदेसाई यांनी काल व्यक्त केली.

गोवा डेअरीमध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवस्थापनामुळे मोठ्या आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, असा दावा फळदेसाई यांनी केला. प्रशासकीय काळातील सुमारे १० कोटी रुपयांच्या खरेदीशी संबंधित बिले प्रलंबित आहेत. या कालावधीत विनाकारण भरती केलेल्या काही कर्मचार्‍याची चौकशी सुरू असून, रोजंदारीवरील १० जणांना सेवेतून कमी करण्यात आले आहे. गोवा डेअरीच्या पशुखाद्य प्रकल्पासाठी आवश्यक कच्च्या मालाचे दर वाढले आहेत. या पार्श्‍वभूमीवर दूध दरवाढीशिवाय पर्याय नाही.

दूध दरवाढीच्या विषयावर संचालक मंडळाशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे, असेही फळदेसाई यांनी सांगितले.