गोवा खासगी विद्यापीठ कायदा दुरुस्तीला राज्यपालांची मान्यता

0
11

राज्यपालांनी गोवा खासगी विद्यापीठ कायद्यातील दुरुस्तीला मान्यता दिली आहे. गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात 31 जुलै 2025 रोजी गोवा खाजगी विद्यापीठ (दुरुस्ती) विधेयक संमत करण्यात आले होते. राज्यपालांनी 11 सप्टेंबर 2025 रोजी या दुरुस्ती विधेयकाला मान्यता दिली आहे. यासंबंधीची सूचना कायदा विभागाने जारी केली आहे. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले आहे. खाजगी विद्यापीठांना त्यांच्या सुरुवातीच्या स्थापनेच्या टप्प्यात कॅम्पसबाहेरील केंद्रांद्वारे काम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गोव्यात खासगी विद्यापीठांची स्थापना जलदगतीने करणे हा या तरतुदीचा उद्देश आहे, असे सरकारचे म्हणणे आहे.