गोवा प्रदेश काँग्रेस समितीने शिस्तभंगाच्या कारवाईचा भाग म्हणून पक्षाच्या सरचिटणीस मनीषा उसगावकर आणि शमिला सिद्दीकी या दोघांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती काँग्रेसच्या माध्यम विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी काँग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल दिली. गोवा प्रदेशाध्यक्षपदी गिरीश चोडणकर यांची नियुक्ती झाल्यानंतर काही जणांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्याची घोषणा करून काँग्रेस पक्षावर टीका केली होती.

