गोळीबार प्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करा

0
9

येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने राज्य सरकारला बाणसाय-कुडचडे येथील नदीत बेकायदा रेती उपसा करणार्‍या कामगारांवर झालेल्या गोळीबार प्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश काल दिले.

गोवा खंडपीठात राज्यातील बेकायदा रेती उपसा प्रकरणातील याचिकेवरील सुनावणीच्या वेळी हे गोवा खंडपीठाने निर्देश दिले. गोवा रिव्हर सँड प्रोटेक्टर नेटवर्क या एनजीओने ही याचिका दाखल केली आहे. कालच्या सुनावणीवेळी सदर एनजीओने बेकायदा रेती उपसा करणार्‍या कामगारांवर करण्यात आलेल्या गोळीबारात एका कामगाराचा मृत्यू झाला, तर एक कामगार गंभीर जखमी झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणी राज्य सरकारला दोन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.