गोमेकॉत ४ नवीन संशयित कोरोना रुग्ण दाखल

0
194

 

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलच्या कोरोना खास वॉर्डात कोरोना संशयित ४ रुग्णांना काल दाखल करण्यात आले आहे. जीएमसीच्या कोविड प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या ४१३ चाचण्या नकारात्मक आहेत.

गोमेकॉच्या खास कोरोना विभागात २ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, उत्तर गोवा जिल्हा हॉस्पिटलमध्ये २ कोरोना संशयितावर उपचार सुरू आहे. आरोग्य खात्याने २९६ जणांना होम क्वारंटाईनखाली आणले आहेत. तर, ३०३ प्रवाशांना सरकारी क्वारंटाईनखाली आणले आहेत.