गोमेकॉत कोरोनाचे ३ संशयित दाखल

0
124

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलच्या कोरोना खास विभागात कोरोना संशयित ३ रुग्णांना काल दाखल करण्यात आले आहे. आरोग्य खात्याने ३४ जणांना क्वारंटाईन केले आहेत. कोरोना बाधेतून बरे झालेल्या तीन जणांना सात दिवसासाठी होम क्वारंटाईन करण्यात आले आहेत. तर, चार जणांना सरकारी क्वारंटाईनखाली ठेवण्यात आले आहे.

गोमेकॉच्या कोरोना विभागात कोरोना संशयित एकू़ण  ८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर उत्तर गोवा जिल्हा हॉस्पिटलमध्ये १ संशयितावर उपचार सुरू आहे. गोमेकॉतील कोविड प्रयोगशाळेत तपासण्यात आलेले ७५ नमुन्यांचा अहवाल नकारात्मक आहे. तर ४६ नमुन्यांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. एकूण १२१ नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.

सरकारी क्वारंटाईन सुविधेखाली मडगाव रेजिडेन्सीमध्ये १४, मये रेजिडेन्सीमध्ये १२ आणि ओल्ड गोवा रेजिडेन्सीमध्ये ८ जणांना क्वारंटाईन करून ठेवण्यात आले आहेत.