बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळाच्या कोरोना खास वॉर्डात तिघांना काल दाखल करण्यात आले आहे. तर, आरोग्य खात्याने ८३ जणांना क्वारंटाईऩ केले आहेत.
जीएमसीच्या कोविड प्रयोगशाळेत करण्यात आलेला १५३ नमुन्यांचा अहवाल नकारात्मक आहे. कोविड प्रयोगशाळेत १६० नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील १५३ नमुने तपासण्यात आले आहेत. १३ नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. जीएमसीच्या खास विभागात ४ जणांवर उपचार सुरू आहेत. आरोग्य खात्याने १०१ जणांना सरकारी क्वारंटाईऩखाली ठेवले आहे.
दरम्यान, येथील शहरातील एका हॉटेलमध्ये क्वारंटाईऩ करण्यात आलेल्या खलाशांचे कोविड १९ तपासणीसाठी नमुने काल घेण्यात आले आहेत. विदेशातून आलेल्या खलाशांना मंगळवारी गोव्यात आणण्यात आले.