गोमेकॉत कोरोनाचा आणखी एक संशयित

0
118

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय इस्पितळामधील कोरोना खास विभागात कोरोना संशयित एका रुग्णाला काल दाखल करण्यात आले आहे. गोमेकॉच्या कोविड प्रयोगशाळेत तपासण्यात आलेले २० नमुने नकारात्मक आहेत.

गोमेकॉच्या खास कोरोना विभागात कोरोना संशयित ६ जणांवर उपचार सुरू आहेत. तर, मडगाव येथील कोविड इस्पितळामध्ये २ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गोमेकॉच्या कोविड प्रयोगशाळेत ८१ नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यातील २० नमुन्यांची तपासणी करून अहवाल जाहीर करण्यात आला आहे. तर ६१ नमुन्यांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.

आरोग्य खात्याने होम क्वारंटाईनखाली १७५३ जणांना आणले आहेत. केंद्र सरकारकडून प्रवाशांबाबत मिळालेल्या यादीनुसार १५ प्रवाशांना २८ दिवस होम क्वारंटाईनखाली आणण्यात आले आहेत.

कोरोना विषाणूच्या बाधेतून बर्‍या झालेल्या एका व्यक्तीचा सात दिवसांचा क्वारंटाईन पूर्ण झाल्याने त्याला आता सात दिवसांसाठी होम क्वारंटाईनखाली आणण्यात आले आहे. सरकारी क्वारंटाईन सुविधेखाली ८ जणांना ठेवण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य खात्याने दिली.

कोरोनाबाधित

एक रुग्ण बरा

राज्यातील आणखीन एक कोरोनाबाधित रुग्ण बरा झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णाची संख्या आता एकावर  आली  आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी  ट्विट संदेशातून काल दिली. राज्यात एकू़ण सात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले होते. त्यातील पाच कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले होते. तर,  दोन कोरोनाबाधित रुग्णांवर मडगाव येथील कोविड खास इस्पितळामध्ये उपचार सुरू होते.