गोमेकॉत आणखी तीन रुग्ण दाखल

0
117

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाच्या कोरोना खास वॉर्डात कोरोना संशयित आणखीन ३ रुग्णांना काल दाखल करण्यात आले. कोरोना खास वॉर्डात सध्या सहाजणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. मडगाव येथील ईएसआय इस्पितळात कोरोना संशयित १७ रुग्ण आणि मडगावच्या टी. बी. इस्पितळामध्ये ४ रुग्णांना ठेवण्यात आले आहेत. कोरोना संशयित १२ रुग्णांच्या वैद्यकीय तपासणी अहवालाची प्रतीक्षा आहे. कोरोना संशयित ४ रुग्णांचे नमुने २० मार्चला तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळावर २७१ प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे. आरोग्यखात्याकडे घरी निरीक्षणासाठी ११९ प्रवाशांनी नोंदणी केली आहे. घरी निरीक्षणाखाली नोंदणी केलेल्या व्यक्तीची संख्या ५४९ वर पोहोचली आहे. राज्यात आत्तापर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.