गोमेकॉतील ओपीडी उद्यापासून नियमित

0
143

 

बांबोळीतील गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळातील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) उद्या १ जुलैपासून नियमितपणे सुरू करण्यात येणार असून तपासणीसाठी आगाऊ नोंदणी करण्याची सुविधा बंद होणार आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर गोमेकॉतील विविध विभागातील बाह्यरुग्ण विभागातील तपासणी बंद करण्यात आली होती. राज्यात एका बाजूने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ओपीडीसाठी पूर्वनोंदणीची अट काढून टाकल्याने तिथे गर्दी होण्याची शक्यता आहे.