Home बातम्या गोमेंकॉत नवे निमवैद्यकीय अभ्यासक्रम

गोमेंकॉत नवे निमवैद्यकीय अभ्यासक्रम

0

आवश्यक ते सर्व सोपस्कार पूर्ण करून येत्या सप्टेंबरपासून गोवा वैद्यकीय महाविद्यालयात सहा निमवैद्यकीय सेवांचे अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी प्रोस्पेक्टसही उपलब्ध असल्यांची माहिती आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.वरील सुविधा गोव्यात उपलब्ध नसल्याने लाखो रुपये शुल्क भरून येथील विद्यार्थी शेजारच्या राज्यांमध्ये जाऊन शिक्षण घेत असतात.

या अभ्यासक्रमास बराच वाव असतो. त्यामुळे गेल्या सहा महिन्यापासून सोपस्कार पूर्ण करण्याचे काम चालू होते. बांबोळी येथे सुरू करण्यात येणार्‍या, या अभ्यासक्रमामध्ये बेचलर ऑफ ओफतेलमेत्री, बेचलर ऑफ फिजियोथेरपी, ओकुपेशनल थेरपी, बीएससी इन मेडिकल इमेजिन व बीएस सी इन एनेस्टेटीक्स यांचा समावेश असल्याचे पार्सेकर यांनी सांगितले. पहिल्या दोन अभ्यासक्रमांचा काळ ४ वर्षांचा तर अन्य अभ्यासक्रमांचा काळ ३ वर्षांचा असल्याचे ते म्हणाले. सध्या वरील अभ्यासक्रम गोवा वैद्यकीय महाविद्यालयात सुरू करण्यात येणार असला तरी पुढील तीन ते चार वर्षांनंतर या अभ्यासक्रमासाठी वेगळे महाविद्यालय उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रोस्पेक्टस दि. १९ पर्यंत उपलब्ध असून दि. २३ रोजी अर्जांची छाननी होईल. दि. २६ ऑगस्टपर्यंत गुणवत्ता यादी तयार होईल. बारावीच्या टक्केवारीनुसारच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल, असे पासेंकर यांनी सांगितले. प्रत्येक टर्मसाठी ६६००/- रु. शुल्क असेल.