गोमांस प्रश्‍नी केंद्र व राज्य सरकारचे दुटप्पी धोरण : कॉंग्रेस

0
150

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह महाराष्ट्राच्या धर्तीवर गुरांच्या मांसावर पूर्णबंदी घालण्याची घोषणा करतात व गोव्यात मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर गुरांचे मांस उपलब्ध करून देण्याच्या गोष्टी सांगतात, याचा अर्थ काय, असा प्रश्‍न कॉंग्रेस प्रवक्ते आग्नेल फर्नांडिस यांनी काल पत्रकार परिषदेत केला. घटनेच्या ४८ कलमाखाली जनावरांची हत्या करण्यासच बंदी आहे. दुभत्या जनावरांचे संवर्धन करणे हा त्या मागील हेतू आहे, असे असताना केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह गुरांच्या मांसावरच बंदी का घालतात, असा प्रश्‍न करून अल्पसंख्यकांच्या अन्नावर घाला घालून ते अल्पसंख्यकांना भारत सोडून जाण्याचा संदेश देतात, असे फर्नांडिस यांनी सांगितले.