28 C
Panjim
Tuesday, September 22, 2020

गोमंतविभूषण चित्रयोगी ः लक्ष्मण पै

– डॉ. गोविंद काळे

‘मेयो मेडल’ विजेते म्हणून कारकीर्द सुरू करणार्‍या लक्ष्मण पैंनी वयाची नव्वदी गाठली तरी ती आजही अथक सुरू आहे. कला समर्पित जीवन म्हणजे काय आणि कसे याचा चालता-बोलता आदर्श म्हणजे लक्ष्मण पै. रंगात ब्रश बुडविल्याशिवाय आणि कॅनव्हासला लावल्याशिवाय त्यांचा दिवस मावळत नाही.

गोवा मुक्तीपूर्व काळ. १९४३ ते ४७ या पाच वर्षांच्या काळात मुंबईच्या सर जे जे स्कूल ऑफ आर्ट या नामांकित महाविद्यालयातून ‘मेयो मेडल’ विजेते म्हणून कारकीर्द सुरू करणार्‍या लक्ष्मण पैंनी वयाची नव्वदी गाठली तरी ती आजही अथक सुरू आहे. कला समर्पित जीवन म्हणजे काय आणि कसे याचा चालता-बोलता आदर्श म्हणजे लक्ष्मण पै. रंगात ब्रश बुडविल्याशिवाय आणि कॅनव्हासला लावल्याशिवाय त्यांचा दिवस मावळत नाही. एखाद्या कर्मनिष्ठाने कर्म पूर्ण केल्याशिवाय अन्नग्रहण करू नये हा आपला नियम प्राणपणाने जीवनभर आचरणात आणावा, तशा प्रकारची एकनिष्ठा- कर्तव्यनिष्ठा पैंच्या ठिकाणी आजही विद्यमान आहे. स्वाध्यायान्मा प्रमदाः| अध्ययनामध्ये कधीही खंड पडू देऊ नको ही आचार्य परंपरा पैंनी आजही आचरणात ठेवली आहे.
पणजीच्या कला महाविद्यालयात १९७७ साली प्राचार्यपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून १९८५ म्हणजे आठ वर्षे पै सरांचे काम, वागणे, सर्व काही जवळून पाहण्याचा योग आला. एक माणूस म्हणून, चित्रकार म्हणून त्यांचे वेगळेपण स्मरणात राहावे असे हे व्यक्तिमत्त्व. आपल्या आयुष्यातील ऐन तारुण्याची दहा वर्षे पॅरिससारख्या जागतिक कलानगरीत काढलेला हा चित्रकार तसा मनस्वी, मुडी. परंतु त्यांचा मूड कधी कोणाला बाधक अथवा त्रासदायक ठरला नाही.
महाविद्यालयाची बस विद्यार्थांना घेऊन एकदा आवारातून बाहेर पडली की हा कर्मयोगी कामाला लागे. ड्रॉईंग बोर्डवर हँडमेड पेपर लावला जात असे. काळे पेन घेऊन त्यांचे ड्रॉईंग काढणे सुरू होई. कधी रामायणातील हनुमान तर कधी महाभारतातील चित्रे. तोंडामध्ये पाईप मात्र न चुकता असे. सोडलेल्या धुराचा त्रास कोणाला व्हायचा प्रश्‍न नव्हता, कारण त्यांच्याशिवाय कोणी नसे. चित्रकलेसाठी लागणारा हा होता एकांत. तो त्यांनी महाविद्यालयातून निवृत्त होईपर्यंत सांभाळला, सार्थकी लावला. चित्रकाराशिवाय आणखी एका पैलूचे दर्शन घडे ते म्हणजे, महाविद्यालयाच्या छोट्या-मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांतून किंवा अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभात पै सरांचे सुंदर बासरीवादन होई, तर कधी सतारवादन. साथसंगत नसतानाही त्यांचे हे वादन म्हणजे केवळ आत्मानंद. सांस्कृतिक कार्यक्रम किंवा निरोप समारंभ म्हणजे प्रगटीकरणाचे निमित्त. त्यांचा लोकसंपर्क बेताचा. आवश्यक तेवढा. कारण चित्रांच्या आणि स्वरांच्या धुंदीत कोणाची आडकाठी नको. विनाकारण म्हणजे कोणत्याही विषयावरची अनाठायी चर्चा, भाष्य, पसंती, नापसंतीचे उद्गार सरांनी आयुष्यभर टाळले. मी आणि माझी चित्रे हेच त्यांचे विश्‍व होते व आजही आहे. कलेच्या विश्‍वात त्यांनी संसारालासुद्धा येऊ दिले नाही एवढी संसाराविषयी अलिप्तता आणि कलाविषयक प्रामाणिकपणा सांभाळला. हे त्यांना कसे जमते, या प्रश्‍नाचे उत्तर सर थोडेच देणार? ‘चध डएअठउक चध एतजङणढखजछ’ या त्यांच्या ग्रंथात पुसटसे मिळून जाते ते असे-
‘खपळींळरींर्ळींश ळप झरळपींळपस- ुरी ींर्हीेीसह ींहश चर्रीूे झहेींे र्डींीवळे ेुपशव लू ाू ारींशीपरश्र र्ीपलश्रश ठरापरींह चर्रीूे, थहे हरव ळपलेीप रीीं ेीळशपींशव ाळपव ळप झरळपींळपस | खपवळरप लश्ररीीळलरश्र र्ाीीळल रपव ीळपसळपस. चू रीींळीींळल हशीशवळींरीू षराळश्रू श्रळपज्ञ र्ाीीीं लश ींर्हीेीसह हळा’
कळत-नकळत आपल्या कलेच्या उगमाची कहाणी दोनतीन वाक्यांतच सरांनी आटोपती घेतली आहे.
बालपणीच्या संस्कारांची नाळ पै आपल्या जीवनात घट्ट पकडून आहेत. पॅरिसला दहा वर्षे काढली, भारताच्या राजधानीत चाळीस वर्षे काढली आणि जगाचे दौरे केले तरी गोव्याच्या निसर्गाने, उत्सवाने, इथल्या मातीने आणि माणसाने केलेले संस्कार हेच पैंच्या कलेचे अंतःसूत्र आहे. ते त्यांना शेवटपर्यंत टाळता आलेले नाही याची जाणीव प्रकर्षाने त्यांच्या चित्रजीवनाचा आढावा घेतला तर होते. याची मोठी कारणमीमांसा सर देत नाहीत. कारण शब्द आणि भाषेपेक्षा त्यांनी रंग आणि रेषेचे माध्यम अधिक सामर्थ्यवान मानले. ‘एपीेश्रश्रशव री र्ींेर्श्रीपींशशी ळप श्रेलरश्र डर्लेीीं उराि ींे हशश्रि ळप डहळसो ीशश्रळसर्ळेीी षशीींर्ळींरश्र ेष नरालर्रीश्रळा ऊरोवरी ढशाश्रिश रपव ळप ेींहशी र्लेााीपळींू रलींर्ळींळींळशी.’
गोव्यातील मंदिरे, चर्चेस, क्रॉस, जत्रा, उत्सव, संपन्न निसर्ग, बदलते ऋतुचक्र, येथील माणसे, परंपरा, दैनंदिन जीवन सरांना टाळता आलेले नाही. ते तसे शक्यही नसते. कारण तो अनुभव चित्रांतून अनिवार्यपणे व्यक्त होताना दिसतो. हेच तर कलेचे बीजारोपण आणि कलाकाराची कला जगतातील ‘आयडेन्टीटी’; जिच्या जोरावर कलाकार स्वैर आणि स्वच्छंदपणे विहार करीत असतो. तुकोबानी आपल्या एका अभंगातून फार सुंदरपणे व्यक्त केले आहे ः
अनुभवा आले अंगा
जे जगा दावितसे
तुका म्हणे झरा
मुळचाची आहे खरा
गाणे ऐकून ऐकून समजायला लागते तर चित्र पाहून पाहून कळायला लागते. नाही म्हणायला पैंच्या बालमनाला ज्या दोन चित्रकारांनी भुरळ घातली ते दोघेही गोमंतकीयच- ‘चू रिीशपींी रसीशशव ींे ीशपव ाश ींे र्शिीीीश ईीं लरीीळशी रपव क्षेळप डळी ग. ग. डलहेेश्र ेष ईीं ळप र्चीालरळ लेपीळवशीळपस ाू ळपलश्रळपरींळेप ींेुरीवी रिळपींळपस रपव ींहश षराश ेष ॠेरप ईींळीीं खश्रर्श्रीीींीरींेीी ऊळपरपरींह ऊरश्ररश्र रपव ठ. ड. र्चीश्रसरेपज्ञरी.’
पैंना आपले आत्मचरित्र लिहिता आले असते. एखाद्या चांगल्या लेखकाकडून ते लिहूनही घेऊ शकले असते. पण शब्द-माध्यम त्यांना तेवढे प्रभावी वाटत नसावे. शब्दातून अभिव्यक्त होण्यापेक्षा माझी चित्रे बोलतील आणि रसिकांनीही चित्रावरच बोलावे असेही वाटत असेल.
भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे व्यक्तिचित्र (झेीींीरळीं) तयार करून त्यांना प्रत्यक्ष अर्पण करणे हा एखाद्या लेखाचा स्वतंत्र विषय होऊ शकतो, ज्यामध्ये मोठेपणाच्या पाऊलखुणा लपलेल्या असतील. पै सर या फंदात पडत नाहीत. ते चित्र आपल्या ग्रंथात समाविष्ट करून त्याला पूर्णविराम देतात. पंतप्रधानांचे चित्र म्हणून पाहण्यापेक्षा एक चित्र म्हणून त्याचा आस्वाद घ्यावा ही त्यांची भूमिका रास्त मानावी लागेल. कलेच्या नजरेतून पाहणे महत्त्वाचे अशी त्रयस्थ भूमिका किती कलाकार घेताना दिसतात?
१९४७ ते २०१६ ही सत्तर वर्षांची चित्रकलेतील सातत्यपूर्ण वाटचाल बघितली तर प्रामुख्याने लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे त्यांच्या चित्राचे सर्व विषय भारतीय संस्कृती- साहित्य- संगीत- तत्त्वज्ञानाशी निगडीत आहेत. काय आहेत त्यांचे एकूण विषय-
महाकाव्य आणि काव्य ः रामायण, महाभारत, गीतगोविंद, ऋतुसंहार.
भारतीय संगीत ः रागमालिका सिरीज.
तत्त्वज्ञान ः पुरुष-प्रकृती, जन्म-मृत्यू, काम-क्रोध, मोह-मोक्ष.
भारतीय विचारवंत ः गौतमबुद्ध, महात्मा गांधी, पं. नेहरू.
१९५१ ते १९६१ हा दहा वर्षांचा काळ सरांनी पॅरिसमध्ये काढला. तद्नंतर लंडन, म्युनिच, स्टुगार्ट, ब्रेमन, न्यूयॉर्क, बँकॉक, सिंगापूर, कौलालंपूर, सॅन फ्रान्सिस्को या जगप्रसिद्ध शहरांच्या कलादालनातून प्रदर्शनं भरविली. जागतिक कीर्तीच्या या कलाकाराने भारतीय संस्कृतीशी कथीच प्रतारणा केली नाही. नवकलेच्या नावाखाली चित्रकलेला नवनवे धुमारे फुटत होते. रझा, फ्रान्सिस न्यूटन सौझा, बाक्रे, सामंत, आरा या समकालीन चित्रकारांनी भारतीय चित्रकलेला नवनवे आयाम दिले. बदलत्या काळानुरूप या कलाकारांनी (अलीींीरलीं ईीं) अमूर्तवादी चित्रांच्या नव्या संकल्पनेशी जुळवून घेतले. रझा आणि गायतोंडेंची चित्रे अमूर्त असूनही भारतीय चित्रपरंपरेला जवळची वाटणारी होती. नवरसातील बीभत्स, भयानक रौद्र रसांची चलती सुरू असताना गोव्याच्या पैनी मात्र ‘श्रृंगारो वै रसाना राज्ञा’ म्हणून शृंगाररस, करुण आणि वीर रस आपलासा केला. त्यांच्या चित्रात येणारी नग्नता सुंदर व सुसह्य जाणवते. याचे कारण बालपणीचे संस्कार. दलाल, मुळगावकरांचा आदर्शवाद. देवभूमीने जागवलेला सश्रद्धपणा याचा परिणाम प्रारंभीच्या चित्रांवर जेवढा जाणवतो तेवढाच उत्तरार्धातील चित्रांवरही जाणवतो.
संसाराच्या रामरगाड्यात रमण्यापेक्षा वाढत्या संसाराची चित्रे सरांनी रंगविली. आधी एकटा, विवाहानंतर दोघे, पहिले पुत्ररत्न म्हणजे तिघे, त्याचा विवाह, त्याची दोन अपत्ये म्हणजे सरांची नातवंडे. संपूर्ण कुटुंब चित्रातून साकारले. कलर फोटो काढून हे काम सहजपणे झाले असते. पै सरांचा आतला आवाज सांगत असतो, कुंचल्याने कॅनव्हासवर रंगव. ईश्‍वराने जन्माला घातलेल्या सौंदर्याला तुझ्या कुंचल्याने अधिक देखणे कर. कुटुंबवत्सलतेपेक्षा पै चित्रवत्सल अधिक आहेत. हा चित्रकार माणसाच्या आणि निसर्गाच्या प्रेमात फार पडतो. काश्मीरची निसर्गचित्रे कोणीही काढणारच. सरांनी रंगविलेली काश्मीरसुंदरी काश्मीरचे निसर्गसौंदर्य लपेटूनच साकार होते. काश्मिरी पुरुषाच्या माथ्यावर हिमालय अवतरतो तो चित्राचा अविभाज्य भाग बनूनच. माणसाभोवती निसर्ग आणि निसर्गाच्या कुशीत दडलेला मानव अशा प्रकारचे अद्वैत नाते प्रस्थापित होताना दिसते. निसर्ग वेगळा आणि माणूस वेगळा असे होऊ शकत नाही.
स्वामी विवेकानंदांचे वाङ्‌मय जसे वाचले तशी जे. कृष्णमूर्तींची प्रवचने ऐन तारुण्यात पैंनी ऐकली. जीवनाकडे पाहण्याचा सकारात्म आणि सौंदर्यवादी दृष्टिकोन उपजतच त्याना लाभला आहे. पोटाला अन्न जसे अत्यावश्यक, तद्वत किमान त्याहीपेक्षा जगण्यासाठी चित्र रंगविणे महत्त्वाचे अशी त्यांची मनोधारणा आहे.
टाटा उद्योगसमूहाच्या निमंत्रणावरून भारतीय समकालीन चित्रकारांनी दुर्गापूर स्टील फॅक्टरीला भेट दिली होती. रेल्वेची चाके बनविणारी ही फॅक्टरी. पै सरांना ही फॅक्टरी म्हणजे दुर्गेचे विशाल स्वरूप वाटते. कराल जबड्यातून अग्नीच्या ज्वाला बाहेर पडणार्‍या अक्राळविक्राळ दुर्गेचे भव्य रूप सर रंगवितात. दोन चाकांवर विराजमान दुर्गा म्हणजे गतिमान युगातील सतत वृद्धिमान होणारी भविष्यातील औद्योगिक यंत्रणा. या संकल्पनेला दाद द्यायलाच हवी. ‘ऊशरींह ळी श्रळषश.’ मृत्यू हे अंतिम सत्य आहे. उपनिषदीय तत्त्वज्ञानापासून ते संतसाहित्यापर्यंत हा विषय प्रकर्षाने मांडला आहे. ‘यदृष्टं तन्नष्टं’- जे जे दृष्यमान आहे ते ते नाहीसे होणारे आहे. असे जर आहे तर ‘मृत्यू हेच जीवन.’ वेढलेल्या इमारतीच्या मध्ये दिसते ख्रिश्‍चन स्मशानभूमी- होते क्रॉस दर्शन. भव्य इमारतींपेक्षाही क्रॉस काळजाला भिडतात, कारण ते अंतिम सत्याची जाणीव करून देत असतात. पैंचे हे चित्र १९५० सालचे. म्हणजे सहासष्ट वर्षांपूर्वीचे आहे. ऐन तारुण्यातील आहे. भोगवादाला जीवन समजून कवटाळणार्‍या पॅरिस शहरातील विविध चित्रकारांमधील पै नावाचा गोमंतकीय चित्रकार ‘ऊशरींह ळी श्रळषश’ हे चित्र रंगवितो. ऐन तारुण्यात एवढा परिपक्व आणि सत्यान्वेषी विचार मांडतो. चित्र उगीच जन्माला येत नाही. चित्रामागील ही त्यांची तत्त्वज्ञानात्मक भूमिका माझ्यासारख्याला खूपच प्रभावी वाटते. ‘भारतीय चित्रकार- भारतीय चित्रकार’ असे ज्यावेळी म्हटले जाते त्यावेळी केवळ भारतात जन्मला म्हणून भारतीय एवढी माफक व्याख्या करून चालणार नाही. इथल्या मातीशी नाळ जुळावी लागते. पैंच्या या भारतीयत्वाची दखल एक श्रेष्ठ चित्रकार म्हणून घ्यायला हवी. पद्मश्री, गोमंतविभूषण आणि ललित कला अकादमी दिल्लीचे तीनदा पुरस्कार आदी श्रेष्ठतम पदवी आणि पारितोषिके प्राप्त करणार्‍या या चित्रकाराचे अस्सल भारतीयत्व आजच्या कला जगताला कोणीतरी अधिकारवाणीने समजून द्यायला पाहिजे.
चित्रापासून सरांना वेगळे करता येणे कठीण आहे. ज्ञानदेवांनी १४०० वर्षांच्या योगीराज चांगदेवाना उपदेश करताना यात ‘गोडी आणि गुळू| कापूरू आणि परिमळू’ असे वर्णिले आहे. गुळापासून गोडी वेगळी करता येत नाही आणि कापुरातून परिमळ वेगळा काढता येत नाही इतके ते अभिन्न आहे. तसेच पैंचे आणि चित्रकलेचे नाते आहे. वयाची नव्वदी गाठल्यानंतर कर्मेंद्रियांचे काम मंदावते, ज्ञानेंद्रियेसुद्धा आपले कार्य आवरते घेतात. हे सारे निसर्गनियमाला धरून आहे. अशावेळी श्‍वासोच्छ्‌वास म्हणजेच जगणे होऊन बसते तेव्हा पैंचा श्‍वासोच्छ्‌वास म्हणजे चित्र आणि चित्र असतो. पत्नीनिधनानंतर अमेरिकास्थित आपल्या कर्तबगार चिरंजीवाच्या संसारात रमण्यापेक्षा उर्वरित आयुष्य चित्रकलेच्या साधनेत व्यतीत व्हावे या धारणेला, चित्रनिष्ठेला शब्दत कसे बरे मांडावे?
चित्रसूत्रम् सुदुर्विदम्‌|
श्रीविष्णुधर्मोत्तर पुराणातील चित्रकलाविषयक संदर्भ अभ्यासकांना थक्क करायला लावणारे आहेत. वज्र आणि मार्कंडेय ऋषी यांच्यातील हा संवाद. देवतारूप साकारायचे आहे तर काय करावे लागेल यावर मार्कंडेय ऋषी सांगतात की त्यासाठी चित्रसूत्राचे ज्ञान असणे गरजेचे आहे. चित्रसूत्र शिकायचे तर त्यासाठी नृत्यशास्त्राचे ज्ञान गरजेचे आहे. मग नृत्यशास्त्र शिकवा यावर ऋषी म्हणतात, त्यासाठी संगीत- वाद्यवादन कला आत्मसात करायला हवी. वाद्यवादनासाठी गीताचे ज्ञान असले पाहिजे. गीत समजून घ्यायचे तर संस्कृत-प्राकृत भाषा आल्या पाहिजेत. एकासाठी दुसरे, दुसर्‍यासाठी तिसरे, तिसर्‍यासाठी चौथे अशी ही कलेची विचारशृंखला आहे. आपण एखाद्या विषयाचा अभ्यास करताना त्याकडे स्वतंत्रपणे बघतो. परंतु तो विषय दुसर्‍या विषयाशी निगडीत असतो. आजच्या गतिमान युगात हे भान हरवत चालले आहे. मग विषयाचा अभ्यास परिपूर्ण कसा व्हावा. संगीत, नृत्य, वादन हे विषय सरांच्या चित्रातून हाताळलेले दिसतात. चित्रसूत्राचे नाते कळत-नकळत सरांकडून जपले गेले आहे, हे सहज लक्षात येते. या दृष्टीनेही सरांच्या चित्रांचा अभ्यास तज्ज्ञांकडून होणे गरजेचे आहे.
साधारणतः एक आक्षेप असा घेतला जातो की सरांच्या चित्रातून दुःख, कणव, वेदना, दारिद्य्र, वर्तमान यांसारखे विषय येत नाहीत. चित्रांमध्ये अमुकच विषय यावेत किंवा असावेत असे सांगणे म्हणजे कलाकाराच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखे आहे. सुंदरतेचा प्रत्यय कोणाला कसा यावा याचे काही निश्‍चित गणित नसते. दुःख आहे तर आनंदही आहे, तसे जन्म आहे तर मृत्यूही आहे. यातील काय निवडावे, कसे चितारावे हे त्या त्या कलाकाराचे स्वातंत्र्य. पै सरांची चित्रे ही एका आनंदयात्रीची चित्रे आहेत. सरांच्या चित्रातील रंग टवटवीत, तजेलदार असतात. ब्रशच्या फटकार्‍यामध्ये जोरकसपणा जाणवतो. इचिंग आणि ड्रॉईंगमधील रेषेत प्रवाहीपणा दिसून येतो. खंडित होणारी रेषा चित्राला बाधा न आणता उलटपक्षी सौंदर्यामध्ये भर घालते. पळशीकरकरांची लिरिकल लाईन, के. के. हेब्बारांची सिंगिंग लाईन, पै सरांच्या लाईनचे वर्णन कसे करावे?
एका अर्थाने सरांची चित्रे दुःखाशी नाते सांगत नाहीत याचे कारण भारतीय तत्त्वज्ञानातच दडलेले आहे- ‘आनन्दात् एव खलु इमानि जायन्ते| आनन्दात् एव खलु इमानि भूतानि संविशन्ति॥ हेच तत्त्वज्ञान संतानी- ‘आनंदाचे डोही आनंद तरंग| आनंदची अंग आनंदाचे’ असे अनुभविले. लक्ष्मण पै आनंदाचे पुजारी आहेत. ऋषी म्हणाले, ‘आनन्दो ब्रह्मेति व्यजानात्.’ पै म्हणाले, ‘चित्रम् ब्रह्मेति व्यजानात्.’ मी चित्रालाच ब्रह्म मानतो. वयाच्या ९० व्या वर्षात पदार्पण करणारा हा आंतरराष्ट्रीय कीर्तीचा ज्येष्ठ कलाकार चित्ररूपी ब्रह्माची पूजा करण्यात निमग्न आहे. सरांचे हे सुखद दर्शन पाहण्याचा योग गोवेकरांना आला आहे याचे संपूर्ण श्रेय पुलकेरिया डायस या गोमंतकीय सुकन्येला जाते. तिच्यामुळेच सर गोव्यात आले आहेत. या कलाप्रेमी कन्येविषयी लिहिल्याशिवाय लेखाला पूर्णत्व लाभणार नाही.
माजोर्डा येथील बेतालभाटीचे तियात्रीस्ट नोलास्को डायस यांची ही सुकन्या. नोलास्को चांगल्यापैकी कंपोझर. कोंकणी सिंगर. त्यांच्या गाण्याच्या बर्‍याच कॅसेटस् आणि सिडीज् गाजल्या असून तियात्र अकादमीने मोठे अवॉर्ड देऊन त्यांना गौरविले आहे. पुलकेरियाला मात्र चित्रकलेची आवड. जी. आर. थापर यांच्याकडे सचिव म्हणून त्या काम पाहत होत्या. बिझनेसमधील शिरोमणी अवॉर्ड मिळविणारे थापर म्हणजे उद्योगक्षेत्रातील मोठे नाव. त्यांच्याशी विवाह झाला आणि त्या बनल्या शाईस्ता थापर. थापरांंनाही कलेची आवड. बंगलोरच्या केन स्कूल ऑफ आर्टचे प्राचार्य आर. एम. हडपाद चित्रकलेचे शिक्षण देण्यासाठी आठवड्यातून दोनदा त्यांच्या घरी वर्षभर येत होते. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार बंगालचे बिकास भट्टाचार्जी यांचे एक चित्र पाहून आपण चित्रसंग्रह करावा या भावनेने त्या या क्षेत्रात उतरल्या. सुमारे ३५०० चित्रांचा दुर्मीळ संग्रह असणार्‍या थापरबाईंना म्युझियम उभा करण्याचे वेध लागले आहेत. १९९२ साली मडगाव येथे स्थायिक झाल्यापासून गोमंतकीय चित्रकारांच्या चित्रसंग्रहाकडे त्यांनी विशेष लक्ष पुरविले आहे. लिंदाद, अंजेलो फोन्सेको, सौजा यांची चित्रे त्यांच्या संग्रहात आहेत. लक्ष्मण पैंची सुमारे ८० चित्रे (कॅनव्हास) संग्रहात आहेत.
जगभराच्या भ्रमंतीत त्यांच्या लक्षात आले की पै सरांच्या चित्रांची दखल घ्यावी तशी घेतली गेलेली नाही. यातूनच सरांचे चिरंजीव आकाश यांची परवानगी घेऊन सरांना त्यांनी गोव्यात आपल्या घरी मोठ्या कालावधीसाठी ७ ऑगस्टला आणले. १५ ऑगस्टला राजभवनावर गोमंतकातील सर्व मान्यवरांच्या भेटीचा योगही त्यांनी साधला. आपल्या वडिलांना सांभाळावे तसे साईस्ता पै सरांचे दैनंदिन जीवन मोठ्या आत्मीयतेने आणि प्रेमाने सांभाळत आहेत.
या वयात गोव्यात पै सरांना एकाकी राहणे शक्य झाले ते साईस्ता यांचा भक्कमपणे आधार लाभला म्हणून. चित्र काढणे, शास्त्रीय रागदारी संगीत ऐकणे आणि आनंदाने जगणे ही आहे सरांची दिनचर्या. सगळ्या सुखसोई आणि पूर्णवेळ दिमतीला सेवाभावी माणसाची उपस्थिती. मग जगायला आणखी काय हवे? पाईप ओढण्याची सवय होती त्यामुळे बोलताना थोडा त्रास जाणवतो एवढेच. यजींहशीुळीश रश्रश्र ळी ुशश्रश्र ळप ॠेर. एपींळीश लीशवळीं लशळपस ाू िीर्शीीाश ळप ॠेर सेशी ींे डरळज्ञीहर, थहे ळी री सेेव री ाू वर्रीसहींशी. ॠेव लश्रशीी हशी.’
वयाच्या ९० व्या वर्षी चित्र काढणारे हात पाहायला मिळणे म्हणजे परमभाग्य. पै सरांच्या चित्रकलेतील योगदानाची आगळीवेगळी दखल गोमंतकीय जनतेने आणि शासनाने ‘गोमन्तविभूषण’ पुरस्कार जाहीर करून घेतली आहे. पै सरांच्या आयुष्यातील आत्यंतिक समाधानाचा हा प्रसंग ठरला आहे. ‘शतायुषी भव|’ ही शुभकामना.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

अल्झायमरला दूर ठेवण्यासाठी….

डॉ. गजानन पाणंदीकर(न्युरॉलॉजिस्ट- हेल्थवे हॉस्पिटल) २१ सप्टेंबर हा जागतिक अल्झायमर दिन म्हणून साजरा केला जातो. अल्झायमर या रोगाचा...

कोरोना विरोधात रसायन द्रव्ये

डॉ. मनाली म. पवार(सांतइनेज, पणजी) २०२० वर्ष फक्त जगायचे, आरोग्य सांभाळायचे. बस्स..! कोणतीच चिंता नको, कसे होईल ही...

भाजणे : लक्षणे, कारणे, उपचार भाग – २

डॉ. सुरज सदाशिव पाटलेकर(श्रीव्यंकटेश आयुर्वेद, मडगांव) कित्येक लोकांचा असा गैरसमज असतो की भाजलेल्या जखमेवर टूथपेस्ट, क्रीम, बटर इत्यादी...

गायीचे दूध आणि त्याचे स्वरूप भाग – ३

वैद्य स्वाती हे. अणवेकरम्हापसा आपल्या देशी गाईंचे संगोपन अगदी कमी खर्चात होते. म्हणून त्यांना बेवारशासारख्या रस्त्यावर न सोडता...

हडेलहप्पी नको

संसदेचे पावसाळी अधिवेशन मोदी सरकारच्या कृषी विधेयकांवरून वादळी ठरले आहे. रविवारी राज्यसभेमध्ये जो काही प्रकार घडला तो अशोभनीय होता. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी...

ALSO IN THIS SECTION

युद्धसज्जता आणि मुत्सद्दीपणा

प्रा. अशोक ढगे युद्धासाठी लष्कर सातत्यानं सज्ज ठेवावं लागतं. गेल्या पाच महिन्यांपासून भारत आणि चीनमधले संबंध तणावपूर्ण बनले...

गद्य-पद्य वेचे आणि मुलांची जडणघडण

(पुन्हा एकदा…) डॉ. सोमनाथ कोमरपंत कविता सूत्रमय असते; म्हणून ती लक्षात राहते. ती मंत्रमुग्ध आहे;...

दिवाळी अर्थव्यवस्थेला उजाळा देईल?

शशांक मो. गुळगुळे दिवाळी या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी साजरी करू, पण जीवच गेला तर काय करणार?...

अनलॉक

पौर्णिमा केरकर ‘मी’चा सुजाण प्रगल्भ विचारच ‘कोरोना’ला हरवू शकतो! ‘कोरोना’सोबत जगण्याची सवय तर आता करावीच लागेल. हा नवा...

कावा

दत्ताराम प्रभू-साळगावकर अशा लोकांचं वागणं प्रामाणिकपणाचं म्हणजे जणू ‘साधू’सारखं वाटतं. पण ते असतात पक्के संधी‘साधू’! आपण महत्त्वाचे निर्णय...