गोमंतकीयांनी धार्मिक कलहाचा कट हाणून पाडला : आलेमाव

0
4

राज्यात जातीय तेढ निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपने आखलेला कट गोमंतकीयानी हाणून पाडला असल्याचे मत विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी पर्वरी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले. गोमंतकीयांनी बंधुभाव जपला असून, ते येथे कधीही ‘मणिपूरसारखी’ स्थिती निर्माण होऊ देणार नाहीत. त्यासाठी आपण राज्यातील हिंदू, मुस्लिम व ख्रिस्ती धर्मीयांचे आभार मानत असल्याचे आलेमाव म्हणाले. यापुढेही सर्वांनी अशीच एकजुट दाखवून राज्यात शांतता राखावी, असे आवाहनही आलेमाव यांनी केले.

राज्यात चालू असलेला भ्रष्टाचार, जमिनींचे व्यवहार, जमीन रुपांतरणे, म्हादई जलतंटा आदी ज्वलंत विषयांपासून जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी भाजपने सुभाष वेलिंगकर यांना पुढे काढले आहे, असा आरोपही आलेमाव यांनी केला. आरएसएस व इतर उजव्या विचारसरणीच्या संघटनांचा वापर भाजप धर्माच्या आधारे लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी करत आहे, असा आरोपही त्यांनी पुढे केला.