तेलंगणाप्रश्नी वारंवार सागूनही न ऐकता गोंधळ माजविणार्या नऊ खासदारांना लोकसभेच्या सभापती मीरा कुमार यांनी पाच दिवसांसाठी निलंबित केले. निलंबित केलेल्या लोकसभेच्या खासदारांत पाच कॉंग्रेसच्या तर चार तेलगू देसम पार्टीच्या खासदारांचा समावेश आहे.
गोंधळामुळे काल लोकसभेत काहीच कामकाज होऊ शकले नाही. निलंबित तेलगू देसम पक्षाचे खासदार व कॉंग्रेस पक्षाचे खासदार एकमेकावर दोषारोप करीत गोंधळ माजवित होते. शेवटी कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.
एकाच सत्रात त्याच खासदारांना सलग दोनदा निलंबित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
राज्यसभेतही गोंधळ माजविल्याबद्दल दोन खासदारांना दिवसभरासाठी निलंबित करण्यात आले. त्यानंतर राज्यसभेचे कामकाज सुरळीत झाले.