Home बातम्या गैरप्रकारांविरुद्ध कारवाई होणार

गैरप्रकारांविरुद्ध कारवाई होणार

0

मद्य प्राशन करून वाहने चालविणे, सार्वजनिक स्थळी लघवी करणे, भिकारी तसेच रात्रीच्यावेळी संशयित अवस्थेत रेंगाळणे या प्रकारांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे ठरविल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल सांगितले.

रस्त्यांवरील प्लास्टिक काढून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी काल कृतीदलाची बैठक झाली. रस्ते प्लास्टिकमुक्त करण्याची योजना राबविण्यासाठीची पूर्वतयारी करण्याचे काम चालू असल्याचे ते म्हणाले.