गॅस सिलिंडर पुन्हा महागला

0
6

देशातील सर्वसामान्य नागरिक महागाईने आधीच त्रस्त झाले असून, त्यातच काल पुन्हा एकदा घरगुती गॅस सिलिंडरच्या दरांत वाढ झाली. नव्या दरांनुसार, आता संपूर्ण देशभरात घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमती १००० पार पोहोचल्या आहेत. काल घरगुती गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये ३ रुपये ५० पैशांची वाढ झाली, तर तर व्यावसायिक गॅस सिलिंडर ८ रुपयांनी महागला आहे. दरम्यान, गोव्यात घरगुती गॅस सिलिंडर १०२६ रुपयांवर पोहोचला आहे. घरगुती सिलिंडरच्या दरांत केवळ १२ दिवसांत झालेली ही दुसरी दरवाढ आहे.