Home बातम्या गॅस बुकिंग यंत्रणा प्रतिसाद देत नसल्याने गैरसोय

गॅस बुकिंग यंत्रणा प्रतिसाद देत नसल्याने गैरसोय

0

राज्यातील गॅस जोडण्या व एलपीजी सिलिंडर बुकिंग संबंधिचा गोंधळ चालूच असून गॅस बुकिंगसाठी निश्‍चित केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने आपल्या सिलिंडरचे बुकिंग झाले की नाही ते कळण्यास मार्ग राहिलेला नाही.

वरील प्रकारामुळे गॅस ग्राहकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. गोवा बाजार महासंघासह अन्य अनेक गॅस वितरकांची बुकिंग यंत्रणा अद्याप सुरळीत न झाल्याने पेट्रोलियम कंपन्यांनी वेगवेगळ्या वितरकांसाठी भ्रमणध्वनीक्रमांक निश्‍चित केले होते. सदर क्रमांकावर मिस्‌ड कॉल दिल्यानंतर गॅस सिलिंडरचे बुकिंग झाले की नाही, यासंबंधी ताबडतोब एसएमएसच्या माध्यमातून माहिती मिळेल, असे पेट्रोलियम कंपन्यानी व विक्रेत्यांनी सांगितले होते. परंतु मिस्‌ड कॉल देणार्‍या ग्राहकांना संबंधित कार्यालयातून प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. गोवा बाजार महासंघाचे अध्यक्ष नारायण नाईक यांच्याशी संपर्क साधला असता, यंत्रणा सुरळीत करण्याचे काम सुरू असून ते पूर्ण झाल्यानंतर ग्राहकांची गैरसोय होणार नसल्याचे सांगितले. दरम्यान, पेट्रोलियम कंपन्यांनी व नागरी पुरवठा खात्याने केवायसी फॉर्म बाबतीत जागृती केल्याने गॅस विक्रेत्यांच्या कार्यालयाजवळील रांगा कमी झाल्याचे सांगण्यात येते.