अंबाजी फातोर्डा येथे काल सकाळी स्वयंपाक गॅस गळतीने पेट घेतल्याने आग लागून विनोद आमोणकर (५५) भाजून गंभीर जखमी झाले. पूत्र वल्लभ (२५) हा ही जखमी झाला. काल सकाळी ९ वा. ही घटना घडली. यात दोन लाख रु.ची हानी झाल्याचे सांगण्यात आले.
स्वयंपाक घरात देवासमोर समई पेटविण्यासाठी काडी पेटविल्यानंतर आधीपासून चालू असलेल्या गॅस गळतीने अचानकपणे पेट घेतला व विनोद आमोणकर होरपळून जखमी झाले. बाहेर आरडा ओरडा ऐकून स्नान करीत असलेला त्यांचा पूत्र वल्लभ बाहेर आला व आग विझविण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा तोही जखमी झाला. इतक्यात शेजार्यांनी अग्नीशामक दलास पाचारण केेले व आग विझविण्यात आली.विनोद यांना गोमेकॉत पाठविले असून ते ९५ टक्के भाजल्याचे सांगण्यात आले.

