31 C
Panjim
Thursday, April 22, 2021

गूढ वाढले

जगातील आठव्या क्रमांकावरील आणि आशियातील सर्वांत श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील ‘अँटिलिया’ ह्या सत्तावीस मजली आलिशान निवासस्थानापासून पाच – सहाशे मीटरवर गेल्या पंचवीस फेब्रुवारीला आढळलेल्या हिरव्या स्कॉर्पिओ जीपचा मालक हिरेन मनसुख काल कळवा खाडीत मृतावस्थेत आढळला. वरवर पाहता हा मृत्यू संशयास्पद वाटत असला तरी त्याने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, ह्या मृत्यूमुळे सदर धमकी प्रकरणाला एक वेगळे वळण मिळाले आहे.
गेल्या पंचवीस फेब्रुवारीला ‘अँटिलियापासून’ जवळ ही बेवारस जीप आढळताच सिक्युरिटी मॅनेजरने पोलिसांना कळवले. पोलिसांना त्यात वीस – पंचवीस जिलेटिन कांड्या मिळाल्या, काही वाहनांच्या नंबरप्लेट मिळाल्या आणि धमकीचे एक पत्रही मिळाले. गाडीतील स्फोटकांमुळे व ह्या प्लेट अंबानींच्या सुरक्षा ताफ्यातील वाहनांच्या क्रमांकांच्या असल्याने ह्या प्रकरणाला विलक्षण गांभीर्य प्राप्त झाले. ‘हा केवळ ट्रेलर आहे, आम्हाला बिटकॉइनच्या माध्यमातून पैसे हस्तांतरित करणार नसाल तर आपल्या मुलांच्या वाहनाला आमचे वाहन धडकेल’ अशी कोणाच्याही मनात धडकी भरवील अशी धमकी त्या पत्रात देण्यात आली होती. जैश उल हिंद ह्या संघटनेने टेलिग्रामवरून संदेश प्रसारित करून ह्याची जबाबदारी घेत असल्याचेही जाहीर केले. ह्या सगळ्या घटनाक्रमामुळे हा दहशतवादी संघटनेकडून केला गेलेला खंडणीचा प्रकार असावा असा संशय बळावला होता. परंतु नंतर जैश उल हिंदने आम्ही काफिरांकडून पैसे घेत नाही म्हणत आमचा ह्याच्याशी काहीही संबंध नाही असे स्पष्टीकरण दिल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.
स्कॉर्पिओ तेथे उभी करून एका इनोव्हा कारमधून पळ काढणार्‍या व्यक्तीचे दर्शन सीसीटीव्हीत घडले. चालक एका इनोव्हातून पळाला असे स्पष्ट झाले. पोलिसांनी जीप मालकाचा शोध चालवला आणि हिरेन मनसुख ह्या कार डेकॉर आस्थापनाच्या मालकापर्यंत ते पोहोचले. आपली ही जीप वर्षभर बंदच होती. ती विकण्यासाठी घेऊन चाललो असता वाटेत बंद पडली. नंतर आपण तिथे पुन्हा गेलो तर कार चोरीला गेली होती असे त्याने पोलिसांना सांगितले. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता हा हिरेनच मृतावस्थेत सापडला आहे.
ही आत्महत्या पोलिसांच्या संशयाची सुई आपल्यावर वळल्याने केली गेली का, की ह्या प्रकरणासी जोडले गेल्याने झालेली सामाजिक अप्रतिष्ठा जिव्हारी लागल्याने ती केली गेली. किंवा खरोखरच एखादी दहशतवादी संघटना ह्यामागे आहे आणि तिने ह्या कारमालकाचा काटा काढला, ह्यातील सत्य शोधणे हे पोलिसांचे काम आहे. प्रथमदर्शनी तरी हा आत्महत्येचा प्रकार दिसतो. अंबानींना मिळालेल्या धमकीमागे काही दिवसांपूर्वी दिल्लीत इस्रायलच्या दूतावासापुढे बॉम्बस्फोट घडवणारी जैश उल हिंद नव्हती तर नेमके कोण होते? शेतकर्‍यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही धमकी दिली गेली का, त्यामागे खलिस्तानवादी किंवा माओवादी आहेत का असे अनेक प्रश्न ऐरणीवर आले आहेत. अशावेळी हिरेन मनसुखच्या आत्महत्येमागचे कारण काय असावे हा नवा प्रश्न तपास यंत्रणांपुढे उभा झाला आहे. बिटकॉइन हस्तांतरणासाठी जो तपशील दिलेला होता तो खोटा असल्याचेही तपासयंत्रणेने शोधून काढलेले आहे. म्हणजेच ही धमकी खरोखरच दहशतवादी संघटनेने दिली होती का ह्याविषयी आता संशय निर्माण होतो. पुढील तपासात हा सगळा उलगडा होणे गरजेचे आहे. येथे प्रश्न कोण्या एका उद्योगपतीच्या कुटुंबाच्या सुरक्षेचा नाही. मुंबईतील सर्वोच्च सुरक्षा असलेल्या एका विभागामध्ये स्फोटकांनी भरलेली एक कार भरदिवसा बिनदिक्कत ठेवली जाते आणि त्यामागील गूढ उकलले जाऊ शकत नसेल तर ते तपास यंत्रणांचे मोठे अपयश असेल.

STAY CONNECTED

848FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

चैत्रगौरी हळदीकुंकू ः निसर्गपूजा

सौ दीपा जयंत मिरींगकर(फोंडा) गौरीला माहेरपण करणे हे एक निमित्त. निसर्गातील फळाफुलापानांचे रंग, रूप, चवी अनुभवायला आणि लेकीबाळींना...

कालमापनाचे साधन ः ‘पंचांग’

सुमरंग रायसालसेत आम्ही वर्ष, महिना, वार, दिवस जसं लक्षात ठेवतो, तसं पंचांग लक्षात ठेवायला त्रास नाही. ग्रहणाची वेळच सांगते की आमचं पंचांग...

असे व्हायला नको होते, पण…

ज. अ. रेडकर(सांताक्रूझ) ‘‘कुठेही गेले तरी आता पैसे दिल्याशिवाय नोकरी मिळत नाही सर, तेव्हा माझा नाइलाज आहे, निदान...

आईची माया

प्राजक्ता गावकर ‘‘आईची मायाच तशी असते ग पोरी.’’ अपघातात आई गेली पण तिच्या मनात तुला आणि बाळाला पाहायचे...

टॅक्सीचालकांनी संप मागे घेत चर्चेसाठी पुढे यावे ः मुख्यमंत्री

राज्यातील टुरिस्ट टॅक्सीचालकांनी आपला संप मागे घेऊन चर्चेसाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांच्या एका प्रश्‍नावर बोलताना काल...

ALSO IN THIS SECTION

साखळीचे लांच्छन!

साखळीचे नगराध्यक्ष यशवंत माडकर यांना अखेर त्या पदावरून काल पायउतार व्हावे लागले. त्यांच्याविरुद्ध माजी नगराध्यक्ष धर्मेश सगलानी गटाने दाखल केलेला अविश्वास ठराव...

सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध ः मुख्यमंत्री

>> मडगावचे ईएसआय इस्पितळ आजपासून पुन्हा सुरू >> शुक्रवारी कोरोनाने ९२७ बाधित, सहाजणांचा मृत्यू राज्यातील कोरोना...

एक-दोन दिवसांत राज्यात कडक निर्बंध ः तानावडे

राज्यात वाढू लागलेल्या कोरोना संसर्गावर नियंत्रण आणण्यासाठी येत्या एक दोन दिवसांत आवश्यक ते कडक निर्बंध घालण्यात येतील अशी माहिती काल भाजप प्रदेशाध्यक्ष...

साखळी नगराध्यक्षांवर अविश्‍वास ठराव संमत

>> पालिकेत सगलानी गटाचा विजय >> भाजपचे सहाही नगरसेवक गैरहजर साखळीचे नगराध्यक्ष यशवंत माडकर यांच्या विरोधात...

न्यायालयाने लोकशाही वाचवली : कामत

साखळी पालिकेत नगराध्यक्षांवरील अविश्‍वास ठरावात भाजप पुरस्कृत उमेदवाराचा जो दारुण पराभव शुक्रवारी झाला त्यावरून राज्यात भाजप सरकारचा शेवट जवळ आला असल्याचे संकेत...