24.8 C
Panjim
Thursday, January 21, 2021

गुवाहाटीतील कामगिरी उंचावण्याचा गोव्याचा निर्धार

नॉर्थईस्ट युनायटेडशी आज होणार सामना

इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) शुक्रवारी एफसी गोवा आणि नॉर्थईस्ट युनायटेड एफसी यांच्यात लढत होत आहे. हे दोन्ही संघ अद्याप अपराजित आहेत. येथील इंदिरा गांधी ऍथलेटिक स्टेडियमवर एफसी गोवाला मागील मोसमांत समाधानकारक कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे हे अपयश धुवून काढण्याचा गोव्याचा निर्धार आहे.

रॉबर्ट जार्नी यांच्या मार्गदर्शनाखाली नॉर्थईस्टने दोन सामन्यांतून चार गुण मिळवित प्रभावी प्रारंभ केला आहे. बंगळुरूमध्ये बेंगळुरू एफसीविरुद्ध त्यांनी एक गुण कमावला. अशी कामगिरी फार थोड्या संघांना जमली आहे. त्यानंतर नॉर्थईस्टने ओडिशा एफसीवर थरारक विजय मिळविला.

परिस्थितीनुसार खेळ करण्याकडे कल असल्याचे नॉर्थईस्टने दाखवून दिले आहे. बंगळुरूच्या भक्कम संघाविरुद्ध ते सावध खेळले. मग ओडिशाविरुद्ध त्यांनी वर्चस्व राखले. दुसर्‍या सत्रात ओडिशाने दडपण आणले तरी नॉर्थईस्टने अंतिम टप्यात विजयी गोल केला. त्यावेळी ओडिशाच्या कार्लोस डेल्गाडोच्या रेड कार्डचा त्यांना फायदा झाला.
आता एफसी गोवा त्यांचा प्रतिस्पर्धी आहे. गोव्याविरुद्ध त्यांची कामगिरी फारशी प्रभावी नाही. दहा प्रयत्नांत त्यांना दोनच विजय मिळविता आले आहेत. दुसरीकडे २०१७ मध्ये सर्जिओ लॉबेरा मार्गदर्शक झाल्यापासून गोव्याला गुवाहाटीत विजय मिळालेला नाही.

जार्नी यांनी सांगितले की, आकडेवारी ही मोडण्यासाठीच असते आणि यावेळी आम्ही गोव्याविरुद्धच्या खराब कामगिरीत सुधारणा करण्याचा प्रयत्न करू. केवळ गोवाच नव्हे तर प्रत्येक संघाविरुद्ध तुमची रणनीती तयार असते. अगदी वेगवान खेळ करणारे खेळाडू असलेल्या संघांविरुद्ध आण्ही पूर्वी खेळलो आहोत. आमची रणनीती तयार आहे. आम्हाला एकत्रित खेळावे लागेल आणि मैदानावर धुर्त राहावे लागेल.
नॉर्थईस्टचा स्ट्रायकर असामोह ग्यान अद्याप तंदुरुस्त नाही. यानंतरही गोलच्या संधी हेरण्याचे कौशल्य आणि चपळाई कायम असल्याचे त्याने दाखवून दिले आहे. रेडीम ट्लांग आणि बचावपटू काई हीरींग्ज अशा खेळाडूंनी लक्ष वेधून घेतले आहे. गोव्याच्या भक्कम आक्रमणाविरुद्ध हिरींग्जची कसोटी लागेल.
गोव्याची मोसमाची सुरवात एक प्रकारे उत्सुकता ताणणारी ठरली आहे. पहिल्या सामन्यात त्यांनी चेन्नईनचे आव्हान मोडून काढले, पण बंगळुरू एफसीविरुद्ध त्यांना झगडावे लागले. फेरॅन कोरोमीनास याच्या पेनल्टीमुळे त्यांना बरोबरीचा गुण खेचून आणता आला.

लॉबेरा यांनी सांगितले की, पहिल्या सामन्यानंतर मी फार आनंदात होतो, कारण संघाने अत्यंत अवघड परिस्थितीत फार चांगला खेळ केला. आमच्याकडे केवळ तीन परदेशी खेळाडू होते. काही जणांना दुखापत झाली होती. दुसरा सामना मात्र आमच्यासाठी चांगला ठरला नाही. आम्ही बंगळुरूविरुद्ध बरेच झगडलो. अशा खडतर प्रतिस्पर्ध्याविरुद्ध एक गुण मिळणे चांगले ठरले. प्रत्येक सामना वेगळा असतो आणि उद्या एका फार चांगल्या विरुद्ध एक अवघड सामना आहे असे वाटते. बंगळुरूविरुद्धचा सामना म्हणजे अपवाद होता असे मानून शुक्रवारी नेहमीप्रमाणे आक्रमक खेळासाठी गोवा सज्ज राहील. गोव्याचे परदेशी खेळाडूच नॉर्थईस्टसाठी धोकादायक असतील अशी स्थिती नाही. सैमीनलेन डुंगल, ब्रँडन फर्नांडिस आणि सेरीटॉन फर्नांडिस असे खेळाडू सुद्धा लॉबेरा यांच्या मार्गदर्शनाखाली अद्वितीय खेळ करीत आहेत. अहमद जाहौह आणि कोरोमीनास अशा सहकार्‍यांना ते आदर्श साथ देत आहेत.

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

ध्यासपंथी

देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती…वाळवंटातुनी सुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती --बा. भ. बोरकर जीवनभर एखादा ध्यास घेऊन वावरणार्‍या व्यक्ती...

ऐतिहासिक मालिका विजय

कसोटी क्रिकेटमधील वैयक्तिक नीचांकी धावसंख्या ते ऐतिहासिक मालिका विजय असे परस्परविरोधी क्षण टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया दौर्‍यात अनुभवायला मिळाले. राखेतून फिनिक्स पक्षी ज्याप्रमाणे...

तीन-चार दिवसांत मिळेल डिस्चार्ज

>> श्रीपाद नाईक यांनी दिली माहिती देवाची कृपा आणि सर्वांच्या आशीर्वादाने माझ्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. येत्या चार-पाच दिवसात...

केंद्रीय सचिवालय उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन ः मुख्यमंत्री

केंद्र सरकारची राज्यातील सर्व कार्यालये एका छताखाली आणण्यासाठी केंद्रीय सचिवालय उभारण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल...

स्वातंत्र्यसैनिक व ‘मार्ग’चे प्रणेते गुरुनाथ केळेकर यांचे निधन

ज्येष्ठ गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक, कोकणी चळवळीतील एक नेते व ‘मार्ग’ ह्या रस्ता सुरक्षाविषयक चळवळीचे संस्थापक श्री. गुरुनाथ केळेकर (९१) यांचे काल पहाटे ३.३०...

ALSO IN THIS SECTION

वाहतूक नियमभंग दंडाच्या रकमेत कपात नाही ः गडकरी

केंद्रीय रस्ता वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नवीन मोटर वाहन कायद्यातील वाहतूक नियमभंगासाठीच्या दंडाच्या रकमेत कोणतीही कपात न करण्याचे स्पष्ट केले. त्यामुळे गोवा...