नाईक यांची सोसायटीतील गैरव्यवहार प्रकरणी लवादासमोर चौकशी चालू आहे. येत्या दि. १० मार्च रोजी त्यावर सुनावणी होणार आहे. सहकार निबंधकांनी नाईक यांच्यावरील कारवाई न केल्याच्या प्रकरणी फेडरेशनवर कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्याची दखल घेऊन फेडरेशनने संचालक मंडळाची बैठक घेऊन नाईक यांचे संचालकपद रद्द केले.
यासंबंधीची माहिती सहकार निबंधकांना पाठविली जाईल. सदर माहिती सहकार खात्याला कळविली की नाही, यासंबंधी चौकशी करण्यासाठी फेडरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते कार्यालयात नव्हते.
नाईक यांचे संचालकपद रद्द केले तरी त्याचा फेडरेशनवर परिणाम नाही, असे फेडरेशनचे अध्यक्ष नारायण नाईक यांनी सांगितले. आपण २००८ साली मंडळाचा कारभार हातात घेतला होता, त्यावेळी नुकसानीचे प्रमाण ११ कोटी रुपये होते. दरम्यानच्या काळात महासंघाने बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेमुळे आता ही नुकसानी १ कोटी २७ लाख रुपयांवर आली आहे. ती भरून काढणे शक्य आहे. आपण फेडरेशनची आर्थिक उलाढाल २७ कोटींवरून ८२ कोटींवर आणल्याचे नाईक यांनी सांगितले.

