Home बातम्या गुरांचे मांस बेळगावहून आयात करण्याची मागणी

गुरांचे मांस बेळगावहून आयात करण्याची मागणी

0

गुरांचे मांस खाणार्‍या गोमंतकीयांना हे मांस उपलब्ध करण्याकडे दुर्लक्ष करण्याच्या गोवा सरकारच्या वृत्तीचा माजी आमदार व्हिक्टर गोन्साल्विस यांनी निषेध केला आहे. तसेच राज्य सरकारने गुरांचे मांस बेळगावहून आयात करून त्याचा गोवा मांस प्रकल्पाशी संबंधित असलेल्या ५९ व्यापार्‍यांना पुरवठा करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

सध्या न्यायप्रविष्ट असलेल्या या संबंधीच्या प्रकरणी न्यायालय निवाडा देईपर्यंत वरीलप्रमाणे सरकारने मांस उपलब्ध करावे, असे गोन्साल्विस यांनी म्हटले आहे.

गोव्यात गुरांचे मांस उपलब्ध नसल्याने त्याचा फटका हॉटेल्स व पर्यायाने पर्यटनाला बसला असल्याचेही त्यांनी एका प्रसिध्दी पत्रकांत नमूद केले आहे. गोव्यात गावोगावी समारंभामध्ये गुरांच्या मासाचे पदार्थ केले जातात. मात्र मांस उपलब्ध नसल्याने यावरही परिणाम झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.