गुन्ह्यांच्या जागृतीसाठी पोलिसांच्या कवायती

0
97

राज्यात घडणार्‍या वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांच्या बाबतीत जनता जागृत असणे व कोणत्या क्षणी कोणती पाऊले उचलावी याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. या पार्श्‍वभूमीवर काल रात्रीपासून वेगवेगळ्या इमारती, आस्थापनांच्या परिसरात राष्ट्रीय सुरक्षा गार्डच्या मदतीने कवयाती सुरू केल्या आहेत. पुढील तीन दिवस त्या चालेल. दिल्ली येथील एनएसजीचे एक पथक सध्या गोव्यात आहे. स्थानिक पोलिसांना प्रशिक्षणही त्यांच्याकडून मिळत असल्याचे पोलीस महानिरीक्षक सुनिल गर्ग यांनी सांगितले.