मडगाव येथून चांदर येथे जाणार्या क्र. जीए ०२ टी. ४७४७ या बसला काल रात्री ७.४५ वा.च्या सुमारास गुडी-पारोडा येथे अपघात होऊन १६ प्रवासी जखमी झाले. यापैकी दोघे प्रवासी गंभीर जखमी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बहुतेक प्रवाशांना मडगाव येथील हॉस्पिसियो इस्पितळात दाखल करण्यात आले असून गंभीर जखमींना बांबोळी येथील गोमेकॉ इस्पितळात पाठविण्यात आले आहे. १६ जखमींपैकी १५ महिला असून त्या मडगावात दुकानांमध्ये काम करणार्या आहेत. अपघातातील जखमींची नावे पुढीलप्रमाणे-
अनिषा पाशेको (१९), रोझालिना मिनेझिस (५४), प्रसियो मिनेझिस (२४), शोभना कार्वाल्यो (१९), आल्जिरा फर्नांडिस (२२), लिंदा ऑलिव्हेरो (२०), डेल्जिया कुरिया (२०), ऍज्मा गोम्स (२१), प्रिया गोम्स (१९), लिंडा पिशेतो (१९), कातारिना आलिवेरो (५०), मीरा रिबेलो (२०), शुबर्ट कार्वाल्हो (२०), सेबास्तियाना कार्वालो (४५), रोशेल गोम्स (१६), हे सर्वजण गुडी, चांदर, असोल्डा येथील प्रवासी आहेत. गुडी-पारोडा येथील वळणावर चालकाचा ताबा गेल्यानंतर बस शेतात कोसळल्याने त्यात प्रवासी जखमी झाले. बहुतेकांच्या डोक्याला तसेच हातापायांना जखमा झाल्या आहेत. अपघातानंतर माजी आमदार दामू नाईक व भाजप कार्यकर्ते चंदन नाईक यांनी सहकार्य केले. पोलिस उपअधीक्षक मोहन नाईक व निरीक्षक सुदेश नाईक यांनीही मदतकार्यास मार्गदर्शन केले.