गुजरातमध्ये महाराष्ट्रातील35 पर्यटक पुरामुळे अडकले

0
16

गुजरातमध्ये पर्यटनासाठी गेलेले महाराष्ट्रातील जवळपास 35 पर्यटक पुराच्या पाण्यात अडकले. ही घटना गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील औरंगा नदीच्या पूरस्थितीत घडली. खासगी ट्रॅव्हल बसने फिरायला गेलेले हे पर्यटक नदीला पूर आल्यामुळे अडकले होते.
जालना, संभाजीनगर (औरंगाबाद) आणि परभणी जिल्ह्यातील हे पर्यटक गुजरातच्या विविध पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी निघाले होते. प्राथमिक माहितीनुसार, या 35 पर्यटकांपैकी 17 जण जालना जिल्ह्यातील आहेत. उर्वरित पर्यटक संभाजीनगर आणि परभणी जिल्ह्यातील आहेत. सर्वजण एका खासगी ट्रॅव्हल बसने प्रवास करत होते. नदीच्या पुराच्या पाण्यात बस अडकल्याची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, स्थानिक प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलांच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. हेलिकॉप्टरद्वारे सर्व पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले.