30 C
Panjim
Monday, September 28, 2020

गायीचे दूध आणि त्याचे स्वरूप

डॉ. स्वाती हे. अणवेकर
म्हापसा

मागील काही दशकांमध्ये अन्य देशाप्रमाणे आपल्या देशातदेखील टाइप-१ डायबिटीज, वंध्यत्व, ऑटिझम तसेच अन्य बरेच ऑटो-ईम्यून आजार ह्यांचे प्रमाण वाढले आहे आणि ह्याचे मुख्य कारण आहे ह्या विदेशी प्राण्यांच्या दुधाचा आपल्या आहारात असलेला वापर!

आजच्या ह्या लेखमालेमध्ये आपण दुधाबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ह्यामध्ये Aए-१ आणि ए-A२ दूध म्हणजे नेमके काय?… हे दूध कोणत्या जातीच्या गाईपासून उपलब्ध होते?… तसेच ह्या दोन्ही प्रकारच्या दुधाचा शरीरावर काय परिणाम होतो?… हे सर्व आपण जाणून घेणार आहोत.

आपल्याला माहितीच असेल की आपल्या देशामध्ये बरीच जनसंख्या दुधाचा वापर आहारात एक पोषक घटक म्हणून करते. लहान बालकांना क्षीराद व क्षिरान्नाद अवस्थेत आईचे दूध व त्यासोबत बाहेरचे दूध पोषक म्हणून पाजले जाते. तसेच लहान मुले; तरुण-तरुणी; गरोदर महिला व वृद्ध अशा बर्‍याच जणांच्या आहारात दुधाचा समावेश प्राकृतिक स्वरूपात अथवा दुग्धजन्य पदार्थांच्या स्वरूपात असतोच.

मग पूर्वीच्या काळी अर्थात आपल्या पालकांच्या लहानपणी मिळणारे दूध आणि आज आपण आपल्या मुलांना पाजतो ते दूध ह्याची गुणवत्ता तशीच आहे का?… हा मुद्दा खरोखरच प्रत्येकाला विचार करायला लावेल जेव्हा तुम्ही ही संपूर्ण लेखमाला वाचाल. पूतनामावशीने श्रीकृष्णाला आपले विषारी दूध पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असता तो श्रीकृष्णाने कसा हाणून पाडला ही गोष्ट आपण जाणतोच. अगदी अशीच जर्सी व तिच्यासारख्याच अन्य विदेशी पुतनामावश्या ज्यांना आपल्या देशात विदेशी गाई ह्या नावाने संबोधून भूषित केले जाते अशा गाईरुपी पशूचे दूध पिऊन आपल्या देशातील श्रीकृष्णरुपी बालके आजारी पडू लागली आहेत. तुम्हाला माहीत असेल की मागील काही दशकांमध्ये अन्य देशाप्रमाणे आपल्या देशातदेखील टाइप-१ प्रमेह (डायबिटीज), वंध्यत्व, ऑटिझम तसेच अन्य बरेच स्वयंप्रतिरोधक (ऑटो-ईम्यून) आजार ह्यांचे प्रमाण वाढले आहे. आणि ह्याचे मुख्य कारण आहे आपण पीत असलेले ह्या विदेशी प्राण्यांचे दूध.

साधारण ४०-५० वर्षांपूर्वी आपल्या देशात धवल क्रांती निर्माण करण्यासाठी व दुधाचे उत्पन्न वाढवायला विदेशी जर्सीसारख्या प्राण्यांचे आपल्या देशी गाईंसोबत संयोग करून ह्या संकरित गाई निर्माण केल्या व आपल्या देशी गाईंचे बीज नष्ट केले गेले. अशा ह्या संकरित गाईंचे दूध हे दूध प्रमाणात: भरपूर मिळत असले तरी त्याची गुणवत्ता; त्याचा जनतेच्या शरीरावर होणारा दूरगामी परिणाम ह्याचा विचार केला गेला नाही आणि त्याचे दुष्परिणाम आपण आज भोगत आहोत.

कोणते हे दुष्परिणाम?….
आता प्राणिज दुधाचे संघटन कसे असते ते पाहूया.. अर्थात गाईच्या दुधाचे. ते समजून घेणे आवश्यक आहे. दुधात ८७% पाणी आणि १३% घन पदार्थ ज्यात चरबी, प्रथिने, लॅक्टोज नामक साखर आणि अन्य खनिज असतात. ह्या दुधात २ प्रकारचे प्रथिने असतात
१) केसीन उरशीळप
२) व्हे थहशू
केसीन हे तळाशी संचित होऊन त्यांचे रूपांतर घनामध्ये होते. तर व्हे प्रथिन हे द्रवामध्ये असते. आता ह्या केसीन प्रथिनाचे पुढे ३ भेद होतात- अल्फा, बीटा आणि काप्पा केसीन. इथे केसीन मध्ये बीटा केसीन हे महत्त्वाचे प्रथिन असून हे गाईच्या जातीप्रमाणे १ लीटर दुधात ९-१२ ग्राम इतके आढळते. ह्या केसीनपासून केसोमॉर्फिन हा मादक घटक उत्पन्न होतो. हा काही दुधांमध्ये भरपूर प्रमाणात उत्पन्न होतो त्याबद्दल सविस्तर माहिती आपण पुढील लेखामध्ये जाणून घेणारच आहोत.

आता गाईंचे Aए-१ व ए-A२ हे कसे ठरते ते प्रथम जाणून घेणे आवश्यक आहे. गाईच्या शरीरात ६ व्या गुणसूत्रामध्ये असणारी जनुकाची जोडी ही २ बीटाकेसीन प्रतीची जनुके घेऊन असते ते असतात A२-A२, A१-A१ अशा स्वरूपात असतील तर त्यांना होमोझायगस असे म्हणतात. पण जर ते A१-A२ अशा स्वरूपात असतील तर त्याला हेटरोझायगस असे म्हणतात.

अर्थात A१-A१ बीटाकेसीन प्रतीची जनुके असणार्‍या गाईच्या दुधात फक्त A१ बीटाकेसीन असते तर A२-A२ बीटाकेसीन प्रतीची जनुके असणार्‍या गाईच्या दुधात A२ बीटाकेसीन असते. तर A१-A२ बीटाकेसीन प्रतीची जनुके असणार्‍या गाईच्या दुधात A१ आणि A२ बीटाकेसीन समप्रमाणात आढळते.

इथे अजून एक समीकरण समजून घेणे आवश्यक आहे – जर A१-A२ बीटाकेसीन प्रतीची जनुके असणार्‍या गाईचा संयोग A२-A२ बीटाकेसीन प्रतीची जनुके असणार्‍या बैलासोबत केला गेला तर जन्माला येणार्‍या पाडसात A२ जनुकांचे प्रमाण अधिक होईल आणि हेच समीकरण वापरून विदेशात A२ जनुके अधिक असणा-या गाईंचे उत्पादन त्यांनी वाढवले. ह्याउलट A१-A२ बीटाकेसीन प्रतीची जनुके असणार्‍या गाईचा संयोग A१-A१ बीटाकेसीन प्रतीची जनुके असणार्‍या बैलाशी केला गेला तर जन्माला येणार्‍या पाडसात A१ जनुकाचे प्रमाण अधिक असेल.
(क्रमशः)

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

सृष्टीच्या रहस्याचा वेध

डॉ. सोमनाथ कोमरपंत रूढार्थाने हे क्रमिक पुस्तक नसून त्याचे उद्दिष्ट काहीसे निराळे आहे. विद्यार्थ्यांना काव्यमाधुरी स्वतंत्र चाखता यावी;...

आश्विन

पौर्णिमा केरकर भातकापणी करून ती पेंडके खळ्यावर तर कधी घराच्या पडवीत आडवी करून ठेवली जायची. त्यावेळी आश्विन घरात...

उपेक्षिताचा अंत

अटलबिहारी वाजपेयी यांच्या सत्तापर्वाचा एक जवळचा साक्षीदार काल राजधानी दिल्लीत असूनही एकाकी निजधामाला गेला. जसवंतसिंह गेले. राजस्थानच्या बारमेरसारख्या ओसाड, वाळवंटी जिल्ह्यातल्या जसोलचा...

बळींची संख्या ४०० पार

>> राज्यात आणखी १० जणांचा मृत्यू, २७ दिवसांत २०९ बळी राज्यात कोरोना रुग्णांच्या बळींचा आकडा ४०० पार झाला असून...

माजी केंद्रीय मंत्री जसवंतसिंह यांचे निधन

माजी केंद्रीयमंत्री जसवंतसिंह (८२) यांचे काल रविवारी दिल्लीत निधन झाले. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली. गेल्या सहा वर्षांपासून...

ALSO IN THIS SECTION

अल्झायमरला दूर ठेवण्यासाठी….

डॉ. गजानन पाणंदीकर(न्युरॉलॉजिस्ट- हेल्थवे हॉस्पिटल) २१ सप्टेंबर हा जागतिक अल्झायमर दिन म्हणून साजरा केला जातो. अल्झायमर या रोगाचा...

कोरोना विरोधात रसायन द्रव्ये

डॉ. मनाली म. पवार(सांतइनेज, पणजी) २०२० वर्ष फक्त जगायचे, आरोग्य सांभाळायचे. बस्स..! कोणतीच चिंता नको, कसे होईल ही...

भाजणे : लक्षणे, कारणे, उपचार भाग – २

डॉ. सुरज सदाशिव पाटलेकर(श्रीव्यंकटेश आयुर्वेद, मडगांव) कित्येक लोकांचा असा गैरसमज असतो की भाजलेल्या जखमेवर टूथपेस्ट, क्रीम, बटर इत्यादी...

गायीचे दूध आणि त्याचे स्वरूप भाग – ३

वैद्य स्वाती हे. अणवेकरम्हापसा आपल्या देशी गाईंचे संगोपन अगदी कमी खर्चात होते. म्हणून त्यांना बेवारशासारख्या रस्त्यावर न सोडता...

चला, कोरोनाबरोबर जगूया

डॉ. मनाली म. पवारसांतइनेज, पणजी संपूर्ण दिवस आबालवृद्धांपर्यंत सर्वांनीच चांगले गरम उकळलेलेच पाणी प्यावे.चांगल्या आहाराबरोबर थोडासा व्यायाम, प्राणायाम,...