गाभा समितीची फेररचना होणार

0
69

अण्णांची माहिती

भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाच्या गाभा समितीची फेररचना करणार असल्याचे अण्णा हजारे यांनी केला सांगितले. समाजाच्या सर्व स्तरातील लोकांच्या प्रतिनिधींना सामावून घेण्यासाठी हा बदल करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

दलित, मुस्लिम, आदीवासी व इतरांना गाभा समितीत सामावून घेण्यात येणार असल्याचे हजारे म्हणाले. युवकांनाही गाभा समितीत स्थान दिले जाणार असल्याचे ते म्हणाले.

सरकार भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात फूट पाडू पाहत असल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला. अरविंद केजरीवाल, किरण बेदी आणि प्रशांत भूषण यांच्यावर वैयक्तिक आरोप वाढू लागल्यानंतर गाभा समितीत फेररचनेचा प्रस्ताव पुढे आला आहे.