गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची बाधा

0
12

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना त्यांच्या घरातील कर्मचार्‍यामार्फत कोरोनाची बाधा झाली असून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात लता मंगेशकर यांना दाखल करण्यात आले आहे. लताजींना कोरोनाची सौम्य लक्षणे दिसत आहेत. लताजी कोरोनाकाळात गेल्या दोन वर्षांपासून घराबाहेर पडलेल्या नाहीत.

लता मंगेशकर यांच्या घरात अनेक कर्मचारी आहेत. ते कर्मचारी अनेकदा घराबाहेर काही वस्तू आणण्यासाठी जात असतात. याच दरम्यान घरातील एका कर्मचार्‍याला कोरोनाची लागण झाली. त्यानंतर लताजींची चाचणी करण्यात आली असून त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. खबरदारी म्हणून लता मंगेशकर मुंबईतील ब्रीच कँडी इस्पितळातील आयसीयू विभागात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले असून त्यांना पुढील ७ ते ८ दिवस रुग्णालयातच राहावे लागणार आहे.