‘गांव जाला जाण्टो’

0
22

नाटकाचा विश्वविक्रम

कला चेतना, वळवई या संस्थेने 18 मे रोजी आपल्या गाजलेल्या ‘गांव जाला जाण्टो’ या कोकणी नाटकाचे सलग सात प्रयोग करून विश्वविक्रम करण्याची किमया साध्य केली. त्यामुळे वर्ल्ड रेकॉर्ड बुक्स ऑफ इंडियामध्ये आता या नाटकाची नोंद झाली आहे. संस्थेने रविवारी 18 मे रोजी फोंडा येथील राजीव गांधी कला मंदिर येथे सकाळी 7.30 ते रात्री 12.30 या दरम्यान या नाटकाचे 7 प्रयोग सादर केले. त्याशिवाय या नाटकात भूमिका करणाऱ्या पाच वर्षीय भूमी नाईक या बाल कलाकाराने या सातही प्रयोगात अभिनय करून एका बाल कलाकाराने एकाच दिवशी नाटकाच्या सात प्रयोगांत भूमिका करण्याचाही विश्वविक्रम केला. वर्ल्ड रेकॉर्ड बुक्स ऑफ इंडियाचे मुंबईस्थित अधिकारी संजय नार्वेकर व सुषमा तांबडकर नार्वेकर यांच्या हस्ते कला चेतना वळवईचे प्रमुख राजदीप नाईक व त्यांच्या नाटकातील सगळ्या कलाकारांना हा विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले.