कागदाच्या अनिर्बंध वापरामुळे कागदनिर्मितीसाठी करावी लागणारी जंगलतोड आणि त्यामुळे होणारे पर्यावरणाचे अपरिमित नुकसान याबद्दल प्रत्येकाला माहीत असतेच, परंतु यासंदर्भात नक्की काय केल्याने प्रश्नाची तीव्रता कमी होईल ह्याबाबत जरा संदिग्धता आढळते. एकदा वापरलेल्या कागदाचा (म्हणजे लिहिलेल्या पानाचा किंवा प्रिंटआउटचा) पुनर्वापर करण्याच्या असंख्य योजना जगभर मांडल्या आणि राबवल्या गेल्या. त्या पानाचा कोरा भाग कापून वापरण्यापासून पाठकोर्या कागदांची उलटी घडी घालून पाकिटे बनवण्यापर्यंत! पण त्यांना म्हणावे तसे यश आलेले नाही. जाताजाता – ङ्ग…नव्या डिजिटल युगामध्ये कागदाचा कार्यालयीन वापर कमी होऊन पेपरलेस ऑङ्गिस अस्तित्वात येईल…’’ असे दोन दशकांपूर्वी छातीठोकपणे वर्तवले गेले होते, मात्र प्रत्यक्षात तसे काहीही घडलेले नाही उलट वर्ल्ड वाइल्डलाइङ्ग ङ्गंडच्या आकडेवारीनुसार प्रिंटआउटच्या संख्येत वाढच झाली आहे! दस्तऐवजांच्या छपाईसाठी दरवर्षी जगभरात सुमारे ४०० दशलक्ष (४ अब्ज) टन कागद वापरला जात आहे आणि हा भार दरवर्षी वाढतोच आहे!! बरे आपण नुसता कागदाचा विचार करीत आहोत. प्रिंटआउटसाठी वापरल्या जाणार्या शाईच्या रिकाम्या ‘कार्टिजेस्’ चे काय? ती तर धातूची किंवा प्लास्टिकची असतात, म्हणजे त्यांचे विघटन आणखीनच अवघड आणि खर्चिक! आता मात्र, रासायनिक प्रक्रियेच्या मार्गाने, या समस्येवर उपाय काढता येईल असे दिसते आहे. युनिव्हर्सिटी ऑङ्ग कॅलिङ्गोर्निया – रिव्हरसाइडमधील संशोधकांच्या संकल्पनेनुसार, विशिष्ट प्रकारच्या द्रव्यांपासून बनवलेला कागद आणि शाई वापरुन, एकदा लिहिलेला मजकूर चक्क पुसून टाकून त्याच कागदावर पुनः लिहिणे शक्य आहे! अशा कागदावर तो ‘ङ्गायनली’ निरुपयोगी बनण्याआधी तब्बल २० वेळा पुनःपुन्हा लिहिता येईल असे त्यांचे म्हणणे आहे.
कागदाचा पुनर्वापर करण्याची ही संकल्पना, तसे पाहिले तर, कागदाचा शोध लागण्यापूर्वीपासून चालत आली आहे!! मध्ययुगीन राजे वा धर्मगुरू कमावलेल्या कातडीच्या तुकड्यावर (काङ्गस्किन) लिहीत असता. लिखित मजकुरात काही चूक झाली किंवा त्याचे कार्य संपले की (कुशल कारागिरांकडून) कातडीचा वरचा थर चक्क खरडून काढला जाई व अशा प्रकारे कातड्याचा तो तुकडा पुनः दोनतीनदा तरी वापरता येत असे.
छपाईसाठी वापरल्या जाणार्या इंक्समध्ये साधारणतः ‘रेडॉक्स’ नामक रंगद्रव्य (डाय) असते. हा पुनर्वापरयोग्य कागद बनवल्यानंतर त्यावर प्रकाश पलीकडे जाऊ न देणारी एक पातळ ‘ङ्गोटोमास्कड् टेम्प्लेट’ चढवली जाते. आता या प्रकरणावर अतिनील (अल्ट्राव्हायोलेट) किरणांचा मारा केल्यास कागदाच्या आच्छादित नसलेल्या भागावर त्यांची प्रक्रिया होऊन ङ्गक्त छापील प्रतिमा शिल्लक राहते. ही प्रतिमा उर्ङ्ग छपाई काढून टाकण्यासाठी हा कागद सुमारे ११५० सेंटिग्रेडपर्यंत तापवल्यास छपाई नाहीशी होऊन पुनः कोरा कागद मिळतो.
‘हा कागद ११५ सेल्सिअस अंशपर्यंत तापवल्याने त्यावर काहीही विपरित परिणाम होत नाही. आपल्या नेहमीच्या वापरातील लेझर प्रिंटरमध्ये देखील कागद २०० सेल्सिअस अंशपर्यंत तापवला जातोच व त्यामुळेच टोनरचे कण कागदाच्या पृष्ठभागावर चिकटून राहू शकतात.’ असे णउठ मधील रसायनशास्त्राचे प्राध्यापक यादोंग यिन यांनी सांगितले. ‘या कागदावरील छपाईसाठी कोणत्याही अतिरिक्त शाईची गरज नसल्याने तो आर्थिक पातळीवर तसेच पर्यावरणाच्या दृष्टिकोनातूनही परवडण्याजोगा आहे. पारंपारिक कागदाला हा चांगला पर्याय ठरू शकतो.’ असेही त्यांना वाटते. अर्थात सध्या हा कागद प्रयोगावस्थेत असल्याने, रेडॉक्स शाई वापरून, त्यावर प्राथमिक रंग आणि त्यांच्या छटाच (नॅचरल रेड, मेथिलिन ब्ल्यू, ऍसिड ग्रीन इ.) छापता येतात. यांमध्ये छपाईपूर्वी हायड्रोजन सेल्युलोजही मिसळतात. त्यामुळे या कागदावरचा छापील मजकूर सहजपणे पुसून तो पुनःपुन्हा वापरता येतो. णउठ कागद याआधी अस्तित्वात आलेल्या ‘अनपॉवर्ड इलेक्ट्रॉनिक रीरायटेबल डिस्प्ले’ पेक्षा वेगळा आहे – हा काचेचा किंवा प्लास्टिकचा बनवलेला असतो आणि त्यावरचीही अक्षरे उष्णता देऊन घालवली जातात.
‘या (णउठ) कागदावर छापलेला मजकूर तीन दिवसांपर्यंत टिकतो आणि त्यादरम्यान तो व्यवस्थित वाचता येतो. त्याची ही सध्याची मर्यादा लक्षात घेता वृत्तपत्रे, कार्यालयीन परिपत्रके इ. छापण्यासाठी त्याचा वापर करणे सयुक्तिक ठरेल. मात्र आमचा हा कागद बनवण्यास तुलनेने सोपा असून त्यासाठीचा उत्पादनखर्च कमी आहे, तो तयार करण्यासाठी कमी उर्जा लागते आणि त्याच्या उत्पादनप्रक्रियेतून बाहेर सोडल्या जाणर्या विषारी द्रव्यांचे प्रमाणही कमी आहे!’ असे प्रा. यिन म्हणतात.
हे रसायनतज्ज्ञ खर्या म्हणजे लाकडाच्या लगद्यापासून बनवलेल्या आपल्या नेहमीच्या कागदाचाही अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पुनर्वापर करता येईल काय याची चाचपणी करीत आहेत कारण असे झाल्यास हा प्रकल्प अधिक व्यावहारिक होईल – छापलेली अक्षरे जास्त काळ टिकावी आणि तरीही एकच कागद १०० वेळा वापरता यावा हे त्यांचे उद्दिष्ट आहे! अर्थात यामध्ये मुख्य समस्या मजकूर छापण्याची नसून तो अनेकवेळा यशस्वीपणे खोडून टाकण्याची आहे हे वाचकांनी ओळखलेच असेल. यासाठी प्रकाशसंश्लेषण वेगाने करणारे अधिक कार्यक्षम सूक्ष्मकण (ङ्गोटोकॅटॅलिटिक नॅनोपार्टिकल्स) बनवण्याचा प्रयत्न चालू आहे. अल्ट्राव्हायोलेट किरणांचा मारा केल्याने अशा कणांचे विघटन जलद आणि पूर्णपणे होऊ शकते.
या संकल्पनेच्या उपयुक्ततेबाबत नेहमीप्रमाणेच दोन-तीन मतप्रवाह आहेत. ‘संकल्पना चांगली असली तरी मुळात कागदाचा वापरच कमी करण्याकडे लोकांची मनोवृत्ती वळवायला हवी…’ असे बहुतेकांचे म्हणणे आहे. याखेरीज ‘माहिती-तंत्रज्ञानाने दाखवलेले ‘पेपरलेस ऑङ्गिस’चे स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने ङ्गारशी पावले टाकली जात नाही आहेत..’ ह्याबद्दलही लोकांना चिंता आहे. वर म्हटल्याप्रमाणे ङ्ग…दैनिक वार्तापत्रे, कार्यक्रमपत्रिका, निमंत्रणे इ. बाबी या नव्या प्रकारच्या कागदावर छापाव्या तर महत्त्वाचे दस्तऐवज, करारपत्रे इ. नेहमीच्या कागदावर (कायमस्वरुपी) असाव्याफ असा मध्यममार्गही सुचवला गेला आहे. या संशोधनाला अमेरिकेच्या उर्जा मंत्रालयाने आर्थिक सहाय्य दिले आहे. याबाबतची अधिक माहिती छर्रींीीश र्उेााीपळलरींळेपी या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाली आहे. एक शंका राहिलीच – या कागदाचा पुरेपूर वापर केल्यानंतर त्याचे विमान करून गच्चीवरून सोडता येईल की नाही? हे देखील सांगा!!

