गरज ईशान्य भारताकडे लक्ष देण्याची

0
427

भारतीय सैन्याला शरण जाणार्‍या ईशान्य भारतातील अनेक दहशतवादी किंवा बंडखोरांच्या निःपातासाठी दोन बटालियन्स् बनवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे त्यांचे असलेले सैनिक कौशल्य हे भारताच्या इतर भागांमधील माओवाद वा दहशतवाद नियंत्रणात आणण्यासाठी वापरता येणे शक्य होणार आहे, तसेच शरण आलेल्या या दहशतवाद्यांना भारतीय अर्धसैनिक दले किंवा पोलिसांमध्ये सामील केल्या मुळे त्यांना नोकरी आणि रोजगाराच्या संधीही मिळणार आहेत.
२०१४ मध्ये ईशान्य भारतामध्ये काश्मीर किंवा माओवाद्यांपेक्षा जास्त हिंसाचार झालेला आहे. या वर्षात देशात वेगवेगळ्या प्रकारच्या दहशतवादामुळे ९७६ नागरिक मारले गेले. त्यामध्ये सर्वांत जास्त म्हणजे ४६५ नागरिक ईशान्य भारतात मारले गेले; तर माओवादामुळे ३१४ नागरिक आणि जम्मू काश्मीरमध्ये १९३ नागरिक मारले गेले. ईशान्य भारत हा देशाचा एक दुखरा कोपरा आहे. बांगलादेशी घुसखोरीमुळे अतिरेक्यांच्या आणि बंडखोरांच्या हिंसाचारामुळे जर्जर झालेल्या या प्रदेशाच्या दुखण्याकडे गांभीर्याने पाहण्याची आणि परिणामकारक उपाययोजना करण्याची गरज आहे. ईशान्य भारतातला हिंसाचार हा तीन प्रकारचा असतो. पहिला प्रकार म्हणजे तेथील वेगवेगळ्या बंडखोर संघटनांनी केलेला हिंसाचार. यामध्ये नागालँडमध्ये एनएससीएन किंवा मणिपूरमध्ये पीपल्स लिबरेशन आर्मी आदी बंडखोर संघटना कार्यरत आहेत. दुसरा प्रकार म्हणजे ईशान्य भारताच्या आदिवासी भागामध्ये माओवादी प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मध्यंतरी, बोडो दहशतवाद्यांनी आसाममधल्या आदिवासींवर हल्ला करुन ८० लोकांना मारले होते. त्यामुळे अनेक आदिवासी संघटना स्वतःचे संरक्षण करण्यासाठी माओवाद्यांची मदत घेत आहेत. तिसरा प्रकार म्हणजे ईशान्य भारतामध्ये अनेक जिहादी दहशतवादी संघटनाही आहेत. त्यासुद्धा मोठ्या प्रमाणात हिंसाचार करीत आहेत. या तिन्ही प्रकारच्या हिंसाचारामध्ये जिहादी दहशतवाद्यांनी केलेल्या हिंसाचाराचे प्रमाण अतिशय जास्त आहे.
सध्या भारत सरकारने युद्धविराम केल्यामुळे ईशान्य भारतातल्या बहुतेक बंडखोर संघटनांंचा हिंसाचार कमी झालेला आहे, पण अलीकडेच मणिपूरमधील एका बंडखोर संघटनेने केलेल्या आईडी स्ङ्गोटामध्ये महाराष्ट्रातील सैन्याचा एक जवान शहीद झालेला आहे. सर्वाधिक काळजीची गोष्ट म्हणजे आता आदिवासी दहशतवादी संघटना आणि माओवादी यांनी जिहादी दहशतवादी संघटनांशी हातमिळवणी केलेली आहे. आदिवासी दहशतवादी संघटनांमध्ये कोब्रा नामक संघटना सर्वाधिक महत्त्वाची आहे. त्यांनी आता मुल्टा (मुस्लिम युनायटेड लिबरेशन टायगर्स ऑङ्ग आसाम) यांच्याशी हातमिळवणी केलेली आहे.
मुल्टा या दहशतवादी संघटनेचे आसाममधल्या कोक्राजार जिल्ह्यामध्ये मोठे अड्डे आहेत. त्यांना बांगलादेशमधील सर्वांत मोठी दहशतवादी संघटना जमाते उल्ङ्ग मुजाहिदीन बांगलादेश (जेएमबी) आणि हरकेतुल जिहादे इस्लामी बांगलादेश या दोन्ही संघटनांशी त्यांचा ङ्गार मोठा संबंध आहे. ते आज ईशान्य भारत आणि आसाममधले सर्वांत वेगाने वाढणारा दहशतवादी गट आहे. मुल्टा या संघटनेचा अध्यक्ष अब्दुल रेहमान नावाचा दहशतवादी सध्या पाकिस्तानमध्ये आहे. मुल्टाने आता आसामच्या बांगलादेशी प्रभावी भागामध्ये उग्रवाद मोठ्या प्रमाणात पसरवण्यास सुरुवात केलेली आहे. अल् कायदाचा सर्वांत मोठा नेता अयामन अलझवायेरी याने मागील वर्षी तयार केलेल्या एका व्हिडीओमध्ये म्हटले होते की आता आसाम आणि ईशान्य भारतामध्ये जिहाद मोठ्या प्रमाणात पसरवणार आहे. याकरिता अल् कायदाने ईशान्य भारतातल्या जिहादी संघटनांशी मोठ्या प्रमाणात हातमिळवणी केलेली आहे. त्यांना बांगलादेशमधून बॉम्बस्ङ्गोट करण्याकरिता स्ङ्गोटक पदार्थ, शस्त्रे आणि दारूगोळा पोहोचवत आहेत.
याशिवाय नॅशनल इनव्हिस्टीगेशन एजन्सीने बर्धमान स्फोटामध्ये जेएमबी या संघटनेच्या आतापर्यंत ३० हून जास्त दहशतवाद्यांना अटक केलेली आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार एनआयएला आसाममध्ये असलेले सहा छुपे मोड्युुल बरबाद करण्यात यश मिळालेले आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या कागदपत्रांमध्ये ईशान्य भारतामधील बांगलादेशींची मदत घेऊन या भागामध्ये मोठ्या प्रमाणात जिहादी दहशतवाद करण्यात येणार असल्याचे उघड झाले आहे. हा हिंसाचार बांगलादेशी घुसखोरांच्या विरुद्ध कारवाई केल्यास प्रत्युत्तर म्हणून केला जाईल.
अल् कायदाने असेही म्हटले आहे की पाकिस्तान ज्याप्रमाणे काश्मिरच्या दहशतवाद्यांना काश्मीर आणि भारताच्या इतर भागांमध्ये हिंसाचार पसरवायला मदत करतो, तसाच बांगलादेशमधल्या दहशतवादी संघटनांनी ईशान्य भारतामध्ये अशाच प्रकारचा दहशतवाद पसरवला पाहिजे, कारण ईशान्य भारत आणि बांगलादेश यांची सीमारेषा जवळजवळ ४०९६ किलोमीटरची आहे. त्यामुळे ईशान्य भारतामध्ये दहशतवाद पसरवण्याकरिता बांगलादेशची भूमिका ङ्गार महत्त्वाची असेल.
याशिवाय मुल्टा आणि इतर दहशतवादी संघटना मणिपूर आणि त्रिपुरामध्ये जिहादी दहशतवाद पसरवण्याकरिता मदत करीत आहेत. त्याकरिता त्यांनी मणिपूरमध्ये इस्लामिक नॅशनल ङ्ग्रंट (आयएनएङ्ग) ही संघटना तयार केलेली आहे. त्यांना म्यानमारमार्गे पाकिस्तानमध्ये किंवा अङ्गगाणिस्तानमध्ये प्रशिक्षण देण्याकरिता पाठवले जाते. त्रिपुरामध्ये पीपल्स युनायटेड लिबरेशन ङ्ग्रंट नावाची संघटना जिहादी दहशतवादी पसरवण्यासाठी मदत करीत आहे. ही संघटना सध्या बांगलादेशी घुसखोरांची संख्या जास्त असलेल्या मणिपूरच्या ढोबेल चन्डेल आणि चुराचानपूर जिल्ह्यामध्ये असा दहशतवाद पसरवण्यास मदत करत आहे.
मणिपूर आणि त्रिपुरामध्ये आता मुस्लिम महिलांनी बुरखा घालायला सुरुवात केलेली आहे. या प्रकारची बुरखा घालण्याची पद्धत ईशान्य भारतामध्ये खास करून मणिपूर आणि त्रिपुरामध्ये कधीही नव्हती. ती आता वाढत आहे. ऑल आसाम युनायटेड डेमोक्रॅटिक ङ्ग्रन्ट या बांगलादेशींची राजकीय संघटनेला लोकसभा निवडणुकीमध्ये ईशान्य भारतातल्या १७ जागांपैकी ४ जागांवर यश मिळालेले होते. नुकत्याच जाहीर झालेल्या सरकारी आकड्यांप्रमाणे आज आसाममध्ये ३४ टक्क्यांहून जास्त मतदार हे बांगलादेशी आहेत. यामुळे २०१५ च्या शेवटी आसाममध्ये होणार्‍या निवडणुकीमध्ये आपण विजयी होऊ, अशी एयूडीएङ्ग या राजकीय पक्षाला आशा आहे. त्यासाठी त्यांना दहशतवादी संघटना आणि इतर एनजीओज मोठ्या प्रमाणात मदत करत आहेत. बांगलादेशमधूनही त्यांना मोठ्या प्रमाणात मदत केली जाते आहे.
तसेच परदेशातून खास करून सौदी अरेबिया आणि क्वाटारमधून त्यांना प्रचंड प्रमाणात पैसे पुरवले जात आहेत. आसाममध्ये आणि ईशान्य भारतामध्ये वाढणार्‍या या जिहादी संघटनांच्या पार्श्‍वभूमीवर एक निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता हिंसाचार घडवणार्‍या कोणत्याही दहशतवादी संघटनेविरुद्ध मोठ्या प्रमाणात भारतीय सैन्याचे ऍन्टी टेररिस्ट ऑपरेशन सुरु केलेले आहे. यामुळे दहशतवादी संघटनांना जे खुले रान मिळाले होते ते कमी झाले आहे. पण ते इतर अनेक पद्धतींनी उग्रवाद पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. अलीकडेच आसाममध्ये झालेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकींमध्ये कॉंग्रेसचा पराभव झाला आणि बहुतेक महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला बहुमत मिळालेले आहे. त्यामुळे पुढच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी ताकदींना यश मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. तसेच देशद्रोही पक्ष आणि संघटना यांच्यावर अंकुश लावला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, मोदी सरकारने लुक ईस्ट म्हणजे पूर्वेच्या देशांकडे बघा हे नवीन धोरण राबवायला मोठ्या प्रमाणात सुरुवात केलेली आहे. पण त्याहून महत्त्वाचे धोरण हे लुक नॉर्थ ईस्ट म्हणजे ईशान्य भारताकडे बघा हे आहे. कारण ईशान्य भारतामध्ये हिंसाचार वाढतो आहे. जिहादी संघटनांचे प्रस्थ हे वाढत आहे. ईशान्य भारताला वाचवण्यासाठी आपल्या ईशान्य भारताकडे लक्ष देणे आणि तेथील हिंसाचारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक बनले आहे.
नुकतेच भारत सरकारने धार्मिक जनगणनेचे आकडे सादर केले. ते २०११ साली झालेल्या जनगणनेच्या सांख्यिकीय वर्गवारीवर आधारित आहेत. खरे तर त्या वेळच्या कॉंग्रेसी सरकारने तीन वर्षांच्या कालावधीत, म्हणजे मार्च २०१२ पूर्वीच ही आकडेवारी सादर करणे आवश्यक होते. पण ही आकडेवारी जनतेसमोर आल्यास निवडणुकीच्या निकालांवर त्याचे परिणाम निश्चितपणे होतील, हे माहीत असल्याने जाणूनबुजून ती आकडेवारी गुलदस्त्यात ठेवण्यात आली. या आकडेवारीनुसार, आसाममध्ये बांगलादेशी मुस्लिमांची संख्या ३४.२ टक्के आणि पश्‍चिम बंगालमध्ये २७ टक्के आहे. हे आकडे २०११ चे आहेत. २०१६ मध्ये येथे निवडणुका होणार आहेत. त्यामुळे ही टक्केवारी अजूनच वाढणार आहे.लाखो बांगलादेशी मुस्लीम आसामात स्थिर होत असण्याची उघडउघड वस्तुस्थिती असताना, घुसखोर म्हणून केवळ बोटावर मोजण्याइतपत बांगला देशींची गणना झाली. त्यांना परत पाठविणे दूरच राहिले. आजघडीला, आसममधील अर्ध्याहून अधिक मतदारसंघांमध्ये बांगला देशियांची मते निवडणूक निकालांसाठी निर्णायक ठरतात. त्याच्या पुढची पायरी म्हणजे तेथे स्थापन झालेला एआययूडीएङ्ग हा पक्ष निव्वळ बांगला देशीय मतदारांवर आधारलेला आहे. ही वस्तुस्थिती मोठी चिंताजनक आहे. येत्या निवडणुकीत जोर मारल्यास आसाम आणि जवळचे त्रिपुरा यासारख्या राज्यांमध्ये या पक्षाचे बांगलादेशी शासन सत्तेवर आले तर नवल वाटू नये. बांगलादेशी घुसखोरी अशीच सुरु राहिली तर २०१६ च्या निवडणुकांमध्ये त्रिपुरा, आसामचा किंवा पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री जर एखादा बांगलादेशी झाला तर त्याचे आपल्याला आश्चर्य वाटू नये.