गच्चीवरून पडल्यामुळे शाळकरी मुलीचा मृत्यू

0
174

हेडलँड सडा येथे गच्चीवरून पडल्याने जान्हवी आबा सातार्डेकर (१४) या शाळकरी मुलीचा अंत झाला. ही घटना काल मंगळवारी सकाळी घडली. हेडलँड सडा येथे जान्हवी ही त्यांच्याच घराच्या गच्चीवर गेली असता पाय घसरून ती खाली कोसळली व जागीच गतप्राण झाली. सातार्डेकर यांच्या घराचे काम चालू असून जान्हवी ही काही कामानिमित्त गच्चीवर गेली होती. जान्हवी ही दीपविहार विद्यालयाची विद्यार्थिनी असून यंदा ती दहावीची परीक्षा देणार होती. मुरगाव पोलिसांनी पंचनामा करून शवचिकित्सा करून मृतदेह त्यांच्या कुटुंबाच्या हवाली केला. संध्याकाळी उशीरा तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.