दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यानंतर आता भाजप खासदार मनोज तिवारी यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. भाजप नेते मनोज तिवारी यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना चाचणी करण्यास सांगितले. केजरीवाल यांनी २ जानेवारीला लखनऊ आणि ३ जानेवारीला उत्तराखंडमधील डेहराडूनमध्ये सभा घेतल्या होत्या. या सभांमध्ये केजरीवाल मास्कशिवाय दिसले होते.
त्यापूर्वी केंद्रीय मंत्री महेंद्रनाथ पांडे आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तसेच कुटुंबातील एक सदस्य आणि कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळल्यानंतर कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका वड्रा यांनी स्वतःला वेगळे केले आहे.