खामेनेईंच्या अंत्यसंस्कारासाठीभाजप-काँग्रेस नेत्यांनाही निमंत्रण

0
9

इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या अंतिम संस्कारासाठी इराणने भारतासोबतचे राजनैतिक संबंध अधोरेखित करत एक मोठा निर्णय घेतला आहे. या ऐतिहासिक अंत्यसंस्कारासाठी इराणने भारतातील सत्ताधारी आणि विरोधी पक्ष अशा दोन्ही बाजूंच्या प्रमुख नेत्यांना अधिकृत निमंत्रण पाठवले आहे. यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इराणने भारताच्या दोन्ही मुख्य राजकीय पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रण पाठवले आहे. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, भाजप अध्यक्ष नितीन नबीन, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेडा आणि माजी परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांचा समावेश आहे. याशिवाय पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमुख महबूबा मुफ्ती आणि जैन संत, तसेच अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक आचार्य लोकेश मुनी यांनाही इराणने या अंत्यविधीसाठी आमंत्रित केले आहे.