राज्यातील खाण व्यवसाय बंद असल्याने फेब्रुवारी २०१३ पर्यंत उपलब्ध झालेल्या अहवालानुसार राज्यातील प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले आहे. या अनुषंगाने माहिती देण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार गेल्या सप्टेंबरपासून राज्यातील खाण व्यवसाय पूर्ण बंद आहे. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने कुडचडे, होंडा, कोडली, अस्नोडा, डिचोली, आमोणा, उसगाव, सांगे व तिळामळ अशा नऊ ठिकाणी प्रदूषणाचे प्रमाण तपासण्याची केंद्रे स्थापन केली आहेत. हवेतील प्रदूषणाचे प्रमाण प्रती घनमीटरामागे १०० मायक्रोग्रॅम्सपेक्षा अधिक झाल्यास ते आरोग्याला अपायकारक ठरते. सध्या हे प्रमाण ७७-८० मायक्रोगॅ्रम्स इतके असल्याचे अहवालात म्हटले आहे.

