Home बातम्या खाण प्रकरणी सुनावणी आता ऑक्टोबर अखेरीस

खाण प्रकरणी सुनावणी आता ऑक्टोबर अखेरीस

0

खाण व्यवसाय बंद होऊन वर्ष उलटले आहे. राज्याच्या महसुलावर त्याचा बराच परिणाम झाला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने लवकर सुनावणी घेऊन निवाडा जाहीर करावा, यासाठी राज्य सरकार व खाण अवलंबितांचे प्रयत्न चालू आहेत.

राज्यातील खाणी पुन्हा सुरू होणे कठीण आहे, अशी सर्वत्र चर्चा असते. त्यामुळे अनेक खाण अवलंबितांनी शेती व अन्य व्यवसायाकडे लक्ष केंद्रित केले आहे. खाणींवरील ट्रक चालविणारे बहुसंख्य ड्रायव्हर बिहार, ओरिसा, झारखंड या भागातील होते. गोव्यात खाण व्यवसाय बंद असल्याने ते यापूर्वीच आपल्या गावी परतले. गोवा सरकारनेही शेती करण्याची तयारी असलेल्यांना सर्व प्रकारचे सहकार्य देण्याची तयारी करून विविध योजना राबविल्या आहेत. त्यामुळे कृषी उत्पन्नातही वाढ होण्यासारखे राज्यात वातावरण तयार झाले आहे.