खाण खात्याचे संचालक प्रसन्न आचार्य यांनी ही तक्रार केलेली असली तरी अजून सदर प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही तक्रार १ हजारहून अधिक पानी असल्याने या तक्रारीचा बारकाईने अभ्यास करावा लागणार असल्याचे ते म्हणाले. त्यानंतरच तक्रारीसंबंधी पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे मिश्रा यांनी स्पष्ट केले.
ही तक्रार कोणाविरुध्द करण्यात आलेली आहे हे सांगण्यास त्यांनी नकार दिला. तक्रार १ हजारहून जास्त पानी असल्याने सविस्तरपणे त्याचा अभ्यास करावा लागेल, असे ते म्हणाले.