खाण अवलंबितांचे धरणे दुसर्‍या दिवशीही सुरू

0
51

खाण अवलंबितांच्या मंचचे धरणे काल दुसर्‍या दिवशीही चालू होते. कायदेशीर खाणी सुरू होईपर्यंत धरणे चालूच राहील असे आंदोलकांनी सांगितले. सावर्ड्याचे आमदार गणेश गावकर यांनी काल सकाळी आझाद मैदानावर येऊन आंदोलकांची भेट घेतली.

खाणींच्या प्रश्‍नावर खाण अवलंबित गोंधळलेले आहेत. आझाद मैदानावर त्यांचे परवापासून धरणे चालू आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पक्षांचे राजकारणी येऊन त्यांना सहानुभूती दाखवित आहेत.