आयटकच्या नेतृत्वाखाली खाण अवलंबित व अन्य कामगारांनी काल खाण व्यवसाय लवकर सुरू करण्याच्या मागणीसाठी शहरात मोर्चा काढला.२०१२पासून राज्यातील खाण व्यवसाय बंद आहे. त्यामुळे हजारो कामगार बेरोजगार बनले आहेत. कामगारांचा आता संयम संपल्याने सरकारने त्वरित खाण व्यवसाय सुरू करावा, अशी मागणी आयटक नेते ख्रिस्तोफर फोन्सेको, ऍड. राजू मंगेशकर, ऍड. सुहास नाईक व अन्य नेत्यांनी केली. सरकार खाण व्यवसाय सुरू करण्याची आश्वासने देत आहे. परंतु प्रत्यक्षात त्याची पूर्तता होत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या सुमारे ३०० कामगारांनी कोर्ट अटक करून घेतली. सरकारच्या आश्वासनावरील जनतेचा विश्वास उडाल्याचे त्यांचे म्हणणे होते.

