खांडेपार नदीवर बंधाऱ्यास नागरिकांचा तीव्र विरोध

0
7

खांडेपार नदीवर बंधारा नकोच, अशी भूमिका काल सोनारबागवासीयांनी घेतली. म्हादईचे पाणी कर्नाटकला वळवू द्यायचे असल्याने स्थानिक लोकांना पाणीपुरवठ्यासाठी रविवारी सोनारबाग रहिवाशांची खांडेपार नदीवर हा बंधारा बांधण्यात येत असल्याचा आरोप लोकांनी केला. सकाळी उसगाव पंचायत सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत रहिवाशांना खांडेपार नदीत सोनारबाग ते मुर्डीपर्यंत अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून बांधण्यात येणार असलेल्या बंधाऱ्याच्या आराखड्याची माहिती देण्यात आली. मात्र, लोकांनी यावेळी या बंधाऱ्यास तीव्र विरोध केला. पाण्याचे नियोजन करायचे होते तर ते आधी का केले नाही? आता म्हादई नदीचे पात्र कोरडे पडल्यानंतर तुम्हाला जाग आली आहे का? असा प्रश्न ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना केला. यावेळी जलस्रोत खात्याचे अभियंते प्रमोद बदामी, फोंडा जलस्रोत खात्याचे विभाग 4 चे साहाय्यक अभियंते शैलेश नाईक, फोंड्याच्या संयुक्त मामलेदार जान्हवी कालेकर, उसगावचे सरपंच नरेंद्र गावकर, उपसरपंच संगीता डोइफोडे, पंच गोविंद परब फात्रेकर आदी उपस्थित होते.