खलाशांना घेऊन दोन जहाजे लवकरच मुरगाव बंदरात

0
143

विदेशातून गोमंतकीय खलाशांना घेऊन येणारी दोन जहाजे मे महिन्याच्या मध्यात मुरगाव बंदरात दाखल होण्याची शक्यता आहे, अशी माहिती राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीत राज्याच्या बंदर सचिवांनी दिली आहे.

विदेशातून गोमंतकीय खलाशांना घेऊन जहाजे मुरगाव बंदरात दाखल झाल्यास खलाशांना उतरवून घेण्याचे काम करावे लागणार आहे, असेही त्यांनी बैठकीत स्पष्ट केले.
केंद्र सरकारने विदेशातून येणार्‍या खलाशांना उतरवून घेण्यासाठी जाहीर केलेल्या दिशानिर्देशांचे पालन करण्याची सूचना राज्य कार्यकारी समितीने केली आहे.

मुरगाव बंदरात खलाशांना घेऊन आलेले जहाज दाखल झाल्यास खलाशांची कोविड चाचणीसाठी आरोग्य खात्याने आवश्यक यंत्रणा उभारली आहे, अशी माहिती आरोग्य खात्याच्या सूत्रांनी दिली.
विदेशामधून जहाजातून मुंबई बंदरात आलेल्या ६० खलाशांना गोव्यात प्रवेश देण्यात आला आहे. तर, कर्णिका या जहाजावरील गोमंतकीय खलाशांना प्रवेश देण्याच्या प्रश्‍नावर तोडगा निघालेला नाही, असेही सूत्रांनी सांगितले.

नागरी पुरवठा खात्याच्या गोडाऊनमधून रेशनचे सामान न उचलणार्‍या स्वस्त दुकान मालकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा नागरी पुरवठा खात्याच्या सचिवांनी दिला आहे. जीवनावश्यक वस्तूंचे वितरण वाढल्याने कदंब बसगाड्यांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करणे बंद करण्यात आले आहे, अशी माहिती नागरी पुरवठा खात्याच्या सूत्रांनी दिली.