खराब रस्त्यांची दुरुस्ती करा : आप

0
16

आम आदमी पार्टीचे गोवा प्रमुख ॲड. अमित पालेकर यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य अभियंत्यांची भेट घेऊन पावसामुळे खराब झालेल्या राज्यातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी काल केली. राज्यातील खराब झालेल्या रस्त्यांची येत्या पंधरा दिवसात दुरुस्ती करण्याचे आश्वासन मुख्य अभियंता उत्तम पार्सेकर यांनी दिले आहे, अशी माहिती ॲड. पालेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.