खनिज निर्यातदार संघटनेने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

0
4

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची गोवा खनिज निर्यातदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काल भेट घेऊन राज्यातील खनिज व्यवसायावर चर्चा केली. राज्यात खाण व्यवसायातील विविध समस्या सोडविण्यासाठी सरकारने सहकार्य करावे, अशी मागणी करण्यात आली. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना संघटनेच्यावतीने एक निवेदन सादर करण्यात आले आहे.