खंडणीप्रकरणी तिघांना अटक

0
3

पर्वरी आणि पेडणे पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या एका कारवाईमध्ये एका व्यावसायिकाकडून 1 लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली संशयित आरोपी टारझन पार्सेकर, सागर पाटील आणि अन्य एक मिळून एकूण तीन जणांना काल अटक केली. या प्रकरणाची सविस्तर माहिती सोमवारी जाहीर केली जाईल, अशी माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली. न्यायालयाने जामीन रद्द केल्यानंतर गेले वर्षभर संशयित आरोपी टारझन पार्सेकर गेले वर्षभर फरार होता.