कोविड-१९च्या योद्ध्यांना भारतीय सेनेकडून सलामी

0
168

कोरोना विषाणूविरोधात आपला जीव धोक्यात घालून लढत असणार्‍या डॉक्टर, नर्सेस, पोलीस, स्वच्छता कर्मचारी आणि मीडिया यांना भारतीय नौदलाने काल रविवारी सकाळी ९ ते १०.३० या वेळेत अनोख्या पद्धतीने सलामी दिली.

भारतीय हवाईदलाने सुखोईसारख्या लढावू विमानांनीकोलकाता, मुंबई आणि दिल्लीसारख्या देशातील वेगवेगळ्या शहरात कोविड रुग्णालयांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. भारतीय लष्कराच्या बॅन्डने या रुग्णालयांजवळ कोरोना योद्ध्यांचे मनोबल वाढवले तर भारतीय नौदल आपल्या युद्धनौका दिव्यांनी उजळवत कोरोना योद्धांना सलामी दिली. कोविड योद्ध्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी इंडियन एअर फोर्सने फ्लाय पास्ट केले आहे. काश्मीर ते कन्याकुमारी आणि आसाम ते गुजरातचे कच्छ असे दोन फ्लायपास्ट एअर फोर्सकडून करण्यात आले. तर समुद्रात भारतीय नौदलांकडूनही कोविड योद्ध्यांना सलामी देण्यात आली.