कोविंद यांनी मानले देशवासीयांचे आभार

0
20

मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल, आजच्याच दिवशी पाच वर्षांपूर्वी तुम्ही सर्वांनी माझ्यावर प्रचंड विश्वास दाखवला आणि तुम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींद्वारे मला भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडून दिले होते.

मी तुम्हा सर्व देशवासीयांचे आणि लोकप्रतिनिधींचे मनापासून आभार व्यक्त करतो, अशा भावना व्यक्त केल्या. काल राष्ट्रपती म्हणून कोविंद यांच्या कार्यकाळाचा शेवटचा दिवस होता. त्यानिमित्ताने त्यांनी देशाला संबोधित केले. राष्ट्रपतींच्या कार्यकाळात माझ्या मूळ गावाला भेट देणे आणि माझ्या कानपूर शाळेतील वृद्ध शिक्षकांचे चरणस्पर्श करणे आणि त्यांचे आशीर्वाद घेणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण असल्याचे कोविंद यांनी सांगितले.

कोविंद यांनी, युवा भारतीयांना त्यांच्या परंपरांशी जोडण्यासाठी तसेच एकविसाव्या शतकात स्वतःच्या पायांवर ठामपणे उभे राहण्यासाठी नवे ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण’ अत्यंत उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला.