Home बातम्या कोळसा घोटाळा फाइल्स गाजणार

कोळसा घोटाळा फाइल्स गाजणार

0

कोळसा वाटपाच्या ज्या काळात घोटाळा झाल्याचा संशय आहे, त्या काळातील महत्त्वाच्या फाइल्स गहाळ झाल्याचा मुद्दा आज संसदेत गाजण्याची चिन्हे आहेत. सरकारने याप्रकरणी स्पष्टीकरण द्यावे व त्यास कोण जबाबदार आहे ते सांगावे, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

दरम्यान, कोळसा खात्याचे मंत्री श्रीप्रकाश जैसवाल यांनी परवाच मान्य केले होते की, १९९३ ते २००४ या काळातील कोळसा वाटपसंबंधी फाइल्स सापडत नसून त्याबाबत चौकशी चालू आहे.