कोलवाळ कारागृहात कैद्यांच्या 2 गटांत हाणामारी

0
12

कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहात कैद्यांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. काल दुपारी 12 च्या दरम्यान टारझन व विजय कारबोटकर यांच्या गटात पूर्ववैमनस्यातून ही हाणामारी झाली. या घटनेची माहिती मिळताच कारागृह महानिरीक्षक ओमवीर सिंग, तुरुंगाधिकारी व पोलिसांनी कारागृहात धाव घेतली. तसेच कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले.

पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार कारबोटकर आणि टारझन यांना कारागृहातील दवाखान्यात नेण्यात येताना दोघांत वाद झाला. त्यानंतर कारागृहातील सुरक्षारक्षकांनी दोघांनाही तातडीने वेगळे केले. यावेळी कारागृहात मोठा गोंधळ उडाला होता.